Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडीओ हे मजेशीर असतात, तर काही अगदीचं भावुक असतात, तर काही व्हिडीओ हे बघणाऱ्यांना चकित करून सोडतात. तुम्ही अनेकदा काही जणांना अनोखे चॅलेंज पूर्ण करताना पहिलं असेल, काहींना स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावताना पहिलं असेल. पण, आम्ही जर तुम्हाला सांगितलं की एका व्यक्तीने एका मिनिटात १९८ लाकडाच्या फळ्या तोडल्या, तर तुमचा विश्वास बसेल का? तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ एखाद्या विशिष्ट स्पर्धेचा आहे. तुम्ही बघू शकता की, रस्त्यावर दोन विटांच्या वर लाकडाच्या फळ्या (Pine Board) आडव्या ठेवण्यात आल्या आहेत. लाकडांच्या फळ्यांना अगदी सलग रांगेत बाजूबाजूला ठेवण्यात आले आहे. नंतर व्हिडीओत एक व्यक्ती येते आणि एक एक करून लाकडाच्या सगळ्या फळ्या आपल्या पायाने तोडताना व्हिडीओत दिसून येत आहे. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती युक्रेनची कराटे प्रशिक्षक आहे आणि यांचे नाव इगोर कपूर असे आहे. बघता बघता व्यक्ती पायाच्या मदतीने अनेक लाकडाच्या फळ्या एका मिनिटात तोडते.
कशा तोडल्या गेल्या एक मिनिटात असंख्य लाकडाच्या फळ्या एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाचं…
व्हिडीओ नक्की बघा :
६० सेकंदात तोडल्या १९८ लाकडाच्या फळ्या :
इगोर कपूर यांनी ६० सेकंदात १९८ लाकडाच्या फळ्या एका मिनिटात एका पायानी तोडल्या आहेत. ‘एका मिनिटात पायांनी सर्वात जास्त लाकडाच्या फळ्या तोडण्याचा ‘विश्वविक्रम’ यांनी रचला आहे आणि या स्पर्धेदरम्यान व्यक्तीची जिद्द, हावभाव अगदीचं बघण्यासारखे आहे. एकदाही तोल जाऊ न देता ही व्यक्ती अगदी वेगात लाकडाच्या फळ्या तोडताना दिसत आहे. तसेच व्हिडीओच्या अगदी शेवटी व्यक्ती स्पर्धा जिंकल्याचा आनंद व्यक्त करतानादेखील दिसून आली आहे. इगोर कपूर यांनी गेल्यावर्षी जूनमध्ये हा विश्वविक्रम केला होता, पण सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि अनेकांना चकित करत आहे.
इगोर कपूर यांचा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् (Guinness World Records) यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दोन दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला आहे. “१९८, बहुतेक पाइन बोर्ड एका मिनिटात पायांनी तोडले” असे कॅप्शन लिहिलेला हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करताना दिसून आले आहेत. काही जण व्यक्तीचे पाय लोखंडी आहेत का? असे देखील म्हणताना दिसत आहेत; तर अनेक जण आम्हीसुद्धा हे करू शकतो असेदेखील म्हणताना दिसत आहेत. तसेच काही जण व्यक्तीच्या मेहनतीला दाद देताना कमेंटमधून दिसून आले आहेत.