स्पार्टन पोकर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या India Poker Championship स्पर्धेचा सांगता सोहळा नुकताच गोव्यात पार पडला. रविवारी गोव्यातील Big Daddy या अलिशान क्रुझवर तब्बल २ हजारांहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपलं नशीब आजमावलं. या स्पर्धेतील विजेत्याला तब्बल ६ कोटींपेक्षा जास्त बक्षीसाची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, चेन्नई, गोवा, हैदराबाद या शहरांतील अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतीय पोकर क्षेत्रात नावाजलेल्या खेळाडूंच्या चाली आणि त्यांचा खेळ पाहण्याचा अनुभवही यावेळी गोवेकरांना मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी पार पडलेल्या या अलिशान सोहळ्याला चार चाँद लावले ते Instagram King डॅन ब्लिझेरियनने. Instagram वरुन आपली श्रीमंत लाईफस्टाईल चाहत्यांना दाखवणारा पोकर प्लेअर डॅन ब्लिझेरीयनने अखेरच्या दिवशी गोव्याला भेट दिली. डॅनचे जगभरात लाखो चाहते आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पोकर खेळण्यासाठी नावाजलेल्या डॅनने यावेळी पोकर खेळासंदर्भातले आपले विचार उपस्थित प्रेक्षकांना सांगितले. डॅनची झलक पाहण्यासाठी यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याव्यतिरीक्त बॉलिवूड अभिनेते कुणाल खेमू, मिनीषा लांबा, रणविजय सिंघा हे देखील या सोहळ्याला हजर होते.

भारतीय समाजात पत्ते किंवा पोकर हा खेळ अजुनही रुजलेला नाही. कित्येक घरांमध्ये पत्ते खेळणं म्हणजे वाईट सवय असं म्हटलं जातं. मात्र इतर खेळांप्रमाणे पोकर खेळातही विशिष्ठ अभ्यासाची गरज असते. समोरचा खेळाडू काय विचार करतो, त्याची चाल काय असेल अशा सर्व गोष्टींचा अनुभवातून अभ्यास केल्यानंतर पोकर खेळ जमू शकतो. भारतीयांच्या मनात असलेला हा गैरसमज दूर करण्यासाठी थोडा वेळ लागेल, मात्र हे आव्हान कठीण असलं तरी ते आम्ही पूर्ण करुन दाखवू. भारतात हा खेळ अजुनही रुजलेला नाही, यासाठी आगामी काळात प्रसारमाध्यमांचं याकडे कसं लक्ष जाईल यावरही काम करणार असल्याचं स्पार्टन पोकरचे विशेष कार्यकारी अधिकारी अमिन रोझानी यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India poker championship 2019 dan bilzerian instagram king psd
First published on: 16-09-2019 at 19:12 IST