अंकिता देशकर

Muslim Express Viral Video: हैदराबाद आणि पश्चिम बंगाल दरम्यान धावणाऱ्या ट्रेनचे मुस्लिम एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्स-ए-कादीर हलकट्टा शरीफसाठी ट्रेन सजवण्यात आली होती. दक्षिण मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या विशेष गाड्या दरवर्षी धावतात, अशी माहिती यासंदर्भात तपास करताना समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांचा संतापात प्रतिसाद पाहता यामागील सत्य परिस्थिती काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लाइटहाऊस जर्नालिज्मच्या तपासात या घटनेचे सविस्तर तपशील समोर आले आहेत.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर युजर AstroCounselKK व्हायरल व्हिडिओ त्यांच्या प्रोफाइलवर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हायरल व्हिडिओचे विविध स्क्रीनशॉट्स घेऊन आम्ही आमचा तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही या सर्व फ्रेम्सवर एकामागून एक रिव्हर्स इमेज शोध सुरू केला.

एका विशिष्ट कीफ्रेमवरून आम्हाला युट्युब व्हिडिओ आढळून आला.

त्यानंतर आम्ही व्हिडिओच्या शीर्षकासह कीवर्ड शोधले आणि YouTube वर दुसरा व्हिडिओ सापडला.

या व्हिडिओ चे शीर्षक होते: १२ ऑगस्ट रोजी उर्स-ए-कादीर हलकट्टा शरीफसाठी विशेष ट्रेन धावली, तर हैदराबादला परतणारी ट्रेनचा प्रवास १४ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता सुरु होईल.

हा व्हिडिओ ११ महिन्यांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.

व्हायरल व्हिडिओमध्ये असलेली ट्रेन आणि ही या युट्युब व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ट्रेनसारखीच दिसत होती. आम्हाला विशेष ट्रेनचे असे आणखी व्हिडिओ सापडले आहेत.

आम्हाला या वर्षी अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिज्युअल देखील आढळले.

व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ट्रेन क्रमांक ‘13418’ हा या व्हिडीओ मध्ये देखील होता.

आम्हाला या व्हायरल ट्रेनचे व्हिज्युअल एका युट्युब रीलमध्ये देखील सापडले.

आम्ही पुढे एक कीवर्ड शोधला, आम्हाला या विशेष गाड्यांसाठी दक्षिण मध्य रेल्वेचे प्रेस रिलीज सापडले.

https://scr.indianrailways.gov.in/view_detail.jsp?lang=0&id=0,5,268&dcd=18436&did=165934812345235C7C9C49D7E2B8A65F67BACA74230F8

हे प्रेस रिलीझ १ ऑगस्ट २०२२ रोजी शेअर करण्यात आले आहे.

https://english.oktelugu.com/80247-2/

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही दक्षिण मध्य रेल्वेचे जन माहिती अधिकारी व मुख्य जनसंपर्क अधिकारी राकेश यांच्याशी संपर्क साधला. राकेश यांनी सांगितल्यानुसार, “ही एक विशेष ट्रेन आहे जी हैदराबाद आणि वाडी दरम्यान चालवली गेली. दरवर्षी हसरथ ख्वाजा सय्यद मोहम्मद बदेशा कादरी चिस्ती यामिनी यांच्या उर्स-ए-शरीफच्या वार्षिक सोहळ्याला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष ट्रेन चालवल्या जातात. यावर्षी १ ते ३ ऑगस्ट 2023 दरम्यान विशेष गाड्यांच्या दोन फेऱ्या चालवण्यात आल्या आहेत.”

हे ही वाचा<< चिखलात आढळली महाकाय प्राण्याची नवी प्रजाती? डायनॉसोर, कासव, साळींदर सगळ्याचं मिश्रण, नीट बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: उर्स-ए-शरीफच्या वार्षिक उत्सवासाठी हैदराबाद ते वाडी दरम्यान चालवल्या जाणार्‍या विशेष गाड्यांचा व्हिडिओ शेअर केला जात आहे ज्यात मुस्लिमांनी प्रवासी एक्स्प्रेसचे ‘मुस्लिम एक्स्प्रेस’मध्ये रूपांतर केले आहे असा दावा करण्यात येत आहे. व्हायरल दावा खोटा आहे.