Train Accident Video Viral : ट्रेनच्या दरवाजावर लटकून प्रवास करणं धोक्याचं असतं, अशा सूचना वारंवार देऊनही लोक सुधारण्याचं नाव घेत नाहीत. ट्रेन प्रवासादरम्यानही ते स्वत:चा जीव धोक्यात घालताना विचार करीत नाहीत. त्यात चालत्या ट्रेनमधून उतरण्याची लोकांना फार हौस असते; पण हीच हौस काही वेळा जीवावर बेतते. दरम्यान, सोशल मीडियावरही ट्रेनमधील अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहिल्यानंतर घाबरून जायला होतं. पण, काही दिवसांनी सर्व विसरून लोक त्याच त्याच चुका पुन्हा करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका ट्रेन अपघाताचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी धावत्या ट्रेनच्या गेटवर उभी राहून उतरण्याचा प्रयत्न करीत असते, यावेळी ती उडी मारते आणि थेट तोंडावर आपटते त्यानंतर जे काही घडतं, ते फारच भयानक आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

ट्रेनमधून उतरण्याच्या नादात तरुणी सापडते जीवघेण्या अपघातात

या व्हिडीओतून लोक कशा प्रकारे रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात हे दिसेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी ट्रेनच्या दरवाजावर उभी राहून प्रवास करतेय. यावेळी चालत्या ट्रेनमधून उतरण्याच्या नादात ती कशी जीवघेण्या अपघातात सापडते हे दिसते. या व्हिडीओचा शेवट इतका भयानक आहे की, तुम्हाला पाहतानाही भीती वाटेल. व्हिडीओत दिसतेय की, त्या तरुणीला रेल्वेस्थानक येण्याआधीच चालत्या ट्रेनमधून खाली उतरायची घाई झालीय. त्यामुळे ती दरवाजावर लटकून उभी असते, मागे उभे असलेले प्रवासी तिला समजावतायत की, अगं, ट्रेनचा स्पीड खूप जास्त आहे. उतरू नकोस; पण ती कोणाचंच ऐकत नाही आणि पुढच्या क्षणी ती ट्रेनमधून उडी मारते.

उडी मारताच ती रुळांच्या बाजूच्या खडीवर जोरात तोंडावर आपटते. ट्रेनचा स्पीडच इतका जास्त होता की, तरुणीला नक्कीच गंभीर दुखापत झाली असणार. व्हिडीओच्या शेवटी तरुणीनं उडी मारल्यानंतर तशीच रुळांच्या बाजूला पडून असल्याचे दिसतेय.

पाहा ट्रेन अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ

ट्रेन अपघाताचा हा भयानक व्हिडीओ @AnathNagrik नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तर काहींनी तरुणीच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पण, कोणीही अशा प्रकारे जीव धोक्यात घालून ट्रेनमधून प्रवास करीत असल्यास ती कृती जीवावर बेतू शकते.