भारतीयांना भारतीय संस्कृतीचा सार्थ अभिमान वाटतो, मग ते खाद्यसंस्कृती असो, पेहराव असो किंवा नृत्य. भारतीय लोक आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करण्यास नेहमीच उत्सुक असतात. भारतामध्ये सणवार उत्साहात साजरे केले जातात. भारतीय लोक एकत्र येऊन सण उत्सव साजरे करतात. नृत्य करतात. नुकताच दुबईतील एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये काही भारतीयांनी दुबईच्या प्रतिष्ठित बुर्ज खलिफावर जाऊन गरबा सादर केला आहे. पण व्हिडिओवरून नवा वाद पेटला आहे. काही लोकांनी सार्वजनिक ठिकाणी नृत्य करणे चुकीचे आहे सांगत भारतीयांना ट्रोल केले तर काहींनी हे अत्यंत सामान्य आहे असे म्हणत समर्थन केले.
व्हायरल व्हिडिओ दुबईमधील आहे. दुबईमध्ये पर्यटनसाठी गेलेल्या काही भारतीयांनी लोकांनी बुर्ज खलिफाला भेट दिली.
दुबईतीलच नाही तर जगातील सगळ्याच उंच इमारत म्हणून बुर्ज खलिफाची ओळख आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक पर्यंटक आवर्जून भेट देतात. छान, फोटो व्हिडिओ काढतात. पण भारतीय लोकांनी तिथे भेट तर दिलीच पण गरबा नृत्यही केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दुबईस्थित कंटेंट क्रिएटर द वॉकिंग लेन्सने शेअर केलेल्या या छोट्या क्लिपमध्ये २०१८ च्या लव्हयात्री चित्रपटातील लोकप्रिय गुजराती गाण्यावर पर्यटक वर्तुळात नाचताना दिसत आहेत. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय पर्यटकांच्या एका गटाने संताप व्यक्त केला.
“व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पर्यटक प्रतिष्ठित बुर्ज खलिफावर ‘चोगडा’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत,” असे इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या कृतीबद्दल रोष व्यक्त केला आणि जागतिक वास्तुशिल्पीय स्मारकाचे डान्स फ्लोअरमध्ये रूपांतर करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
“आम्हाला मान खाली घालायला लावू नका. सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे हे कळाले पाहिजे”, असे एका वापरकर्त्याने म्हटले तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “हे का गौरवले(कौतुक का केले) जात आहे? आपण सार्वजनिक ठिकाणांच्या पावित्र्याचा आदर करायला शिकले पाहिजे.”
एका वापरकर्त्याने जोर देऊन म्हटले: “सार्वजनिक ठिकाणी असे करणे योग्य शिष्टाचार नाही, कारण इतर लोकांना त्रास होऊ शकतो. आपण त्याचा आदर केला पाहिजे.”
आणखी एकाने म्हटले की सार्वजनिक ठिकाणी असे वागणे चुकीचे आहे. इतर लोकांना तुमच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो.
दुसरा म्हणाला की, डान्स येत नाही, लाज तरी वाटते का, मला वाटते, तीही वाटत नाही.
काहींनी भारतीयांचे समर्थन केले. “किती गोड आहे! इतरांना लाज का वाटतेय? जर कोणी सालसा किंवा हिप हॉप केला असता तर लोकांनी कौतुक केला असता. ते फक्त नाचत आहेत आणि कोणताही त्रास न देता आणि निश्चितच ते रीलसाठी आहे म्हणून त्यांना आनंद घेऊ द्या.
या महिन्याच्या सुरुवातीला, ऑस्ट्रियामध्ये गुजराती पर्यटकांच्या एका गटाने स्थानिक रस्त्यावरील कलाकारांना रस्त्यावर नाचण्यासाठी गरबा गाणे वाजवण्याचा आग्रह धरला तेव्हा त्यांच्यावर टीका झाली होती.