Indian Wedding Wall Street Video Viral : भारतीय विवाह सोहळे मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात केले जातात. यात लग्नाची वरात म्हणजे त्याहून धम्माल, मज्जा असते. वरातीतील पाहुणे मंडळी ढोल-ताशे डिजेच्या तालावर नाचण्याचा मोठा आनंद लुटतात. आपण भारतात लग्नाच्या अनेक वराती पाहिल्या आहेत, पण सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील भारतीय लग्नाच्या वरातीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात लग्नाच्या वरातीत सहभागी झालेल्या लोकांनी नाचून चक्क न्यूयॉर्कचा वॉल स्ट्रीट जाम करून टाकला. या लग्नाची वरात शहरातील रस्त्यांवरून जाण्यासाठी न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीटवरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती.

व्हायरल व्हिडीओमध्ये, पारंपरिक भारतीय पोशाख परिधान करून शेकडो पाहुणे लग्नाच्या वरातीत सहभागी झाले आहेत. यावेळी ते वॉल स्ट्रीटवर डीजेच्या तालावर आनंदाने नाचताना आणि गाताना दिसत आहेत. प्रत्येक जण आपल्यापरीने डीजेच्या तालावर थिरकण्याचा आनंद लुटतोय. या वरातीत नाचण्यासाठी जवळपास ४०० पाहुण्यांनी गर्दी केली होती. या वरातीत वधू-वरानेही पारंपरिक पोशाखात नाचण्याचा आनंद लुटला. दरम्यान, वरातीतील गर्दीमुळे संपूर्ण वॉल स्ट्रीट बंद झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी वरात पाहण्यासाठी परदेशी लोकांचीही मोठी गर्दी तिथे पाहायला मिळाली.

अमेरिकेतील या हटके भारतीय लग्नाच्या वरातीचा व्हिडीओ @djajmumbai नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ४०० लोकांच्या वरातीने वॉल स्ट्रीट बंद झाला. कोणी याचा विचार केला असेल का? नक्कीच अशी जादू आयुष्यात एकदाच घडते. या व्हायरल व्हिडीओवर आता लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिले की, एम्पायर स्टेट ऑफ माइंडचे ढोल व्हर्जन ऐकायला मिळेल असे कधीच वाटले नव्हते, हे अद्भुत आहे. दुसऱ्याने लिहिले की, वॉल स्ट्रीटचा एक ब्लॉक बंद करण्यासाठी त्यांनी किती पैसे खर्च केले असतील याची कल्पना करू शकता का? पण, हे पाहणे खरोखर मजेशीर आहे. तिसऱ्या एकाने लिहिले की, ४०० हून अधिक लोक आणि कधीही न संपणारी मजा, हे खरोखरच खूप भन्नाट आहे.