वडील हा कुटुंबाचा आधार असतो. वडील म्हणून त्यांच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. वडिल म्हणून ते मुलांना प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे आधार देतात. स्वत: त्रास सहन करतात पण मुलांच्या गरजा भागवतात. वडिलांना शब्दातून प्रेम व्यक्त करता येत नाही पण त्यांच्या वागणूकीतून मात्र प्रेम दिसते. असाच एका प्रेमळ बापाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक वडील आपल्या मुलीला घास भरवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक भावूक होत आहे.

आता, इंस्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये वडिलांचा आपल्या मुलीची काळजी घेताना दिसत आहे. या क्लिपमध्ये इंडिगो एअरहोस्टेस पूजा बिहानी शर्मा आहे. इंस्टाग्राम रीलमध्ये, पूजा फ्लाइटसाठी तयार होत आहे. ती मेकअप करताना दिसत आहे, तर तिचे वडील तिला एक एक घास खाऊ घालत आहे. लेकीच्या व्यस्त वेळापत्रकात तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची खात्री ते करत आहे.

हेही वाचा -अंड्यांमध्ये पिल्लू कसे तयार होते, माहिती आहे का? मग हा व्हिडीओ पाहाच, व्यक्तीने विचित्र प्रयोगातून दाखवले….

पूजा बिहानीने वडिलांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानत हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहले आहे की,
“बाबा, तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात. मला माहित आहे की मी ते नेहमी हे बोलत नाही, म्हणून मी आज ते आवर्जून सांगेन: बाबा, प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. तुम्ही जिथे असाल तिथे माझे घर आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे पापा,”

हेही वाचा – तहानलेल्या कुत्र्याला पाणी पिण्यासाठी महिलेने केली मदत; व्हिडीओ पाहून लोक म्हणतायत, ”दयाळूपणाची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १२.५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मोहक व्हिडिओबद्दल लोकांनी कमेंट केल्या आहेत. काहींना आपल्या आईची आठवण झाली तर काहींना वडीलांची. काहींनी पुजाला ती खूप भाग्यवान असल्याचे सांगितले. अनेकांना पुजाच्या वडिलांचे प्रेम पाहून अनेकांना तिचा हेवा वाटत आहे.