चंदिगढमधील हरभजन कौर यांची कथा प्रत्येकाला प्रेरणा देऊन जाणारी आहे. हरभजन ‘मेड विथ लव्ह’ या फूड ब्रँडचे संस्थापक आहेत. या ब्रँडअंतर्गत त्या त्यांच्या हाताने बनवलेले बेसन बर्फी आणि लोणचे विकतात. हा व्यवसाय फक्त ४-५ वर्षांपूर्वी सुरु झाला जेव्हा हरभजन या ९० वर्षांच्या होत्या. त्या शहरात आणि इतर ठिकाणी शेकडो किलो बर्फी आणि लोणची विकत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहेत हरभजन कौर

हरभजन या अन्य भारतीय गृहिणीसारख्या होत्या, त्यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांना मिनी, मंजू आणि रवीना या तीन मुली आहेत, त्यापैकी मिनी सर्वात मोठी आहे, मंजू मधली आहे आणि रवीना सर्वात लहान आहे. कौर यांच्या नवऱ्याला खायला आवडायचे, आणि म्हणून त्या त्यांच्यासाठी आणि मुलींसाठी सर्व प्रकारचे पदार्थ बनवायच्या. त्यांच्या प्रवासात नवऱ्याची प्रचंड साथ त्यांना लाभली आहे. त्यांच्या नवऱ्याला त्यांच्या प्रत्येक डिशचा खूप अभिमान होता. “आज ते कदाचित शारीरिकदृष्ट्या उपस्थित नसतील पण मला खात्री आहे की मी जे सध्या करत आहे त्याचा त्यांना अभिमान वाटत असेल.” असं त्या एका पोस्टमध्ये म्हणतात.

ब्रँडची अशी झाली सुरुवात

कौर यांनी आपली मुलगी रवीना सुरीला सांगितले त्यांच्या आयुष्यातील एकमेव खंत अशी आहे की त्या स्वावलंबी नाहीत आणि त्या दिवसापासून हा हरभजन यांचा व्यवसाय झाला. ते एके दिवशी आयुष्याबद्दल बोलत असताना, रवीनाने तिच्या आईला विचारले की तिच्या आयुष्यात काही चुकले का, ज्याला हरभजन यांनी उत्तर दिले, “माझे आयुष्य पूर्ण झाले, पण माझी एकमेव खंत ही आहे की मी स्वतः पैसे कधीच कमावले नाहीत. माझी हीच इच्छा आहे.”

हरभजन यांना माहित न्हवतं की रवीना त्याचं बोलण इतके गंभीरपणे घेईल आणि तिच्या आईची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची गरज तिला वाटेल. या प्रकरणाचा बराच विचार केल्यानंतर, मुलीने तिच्या आईच्या चांगल्या जुन्या पाककृतींचा समावेश असलेल्या उद्योजक उपक्रमात प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांच्या कुटुंबाला  वर्षानुवर्षे आवडलेल्या त्यांनी खाललेल्या पाककृतींचा समावेश केला. “आमचे सर्व आयुष्य, आम्ही घरीचीच मिठाई, स्क्वॅश आणि शेरबेट्ससह वेगवेगळे पदार्थ खालले आहेत. त्या पिढीतील अनेक मातांप्रमाणे, ती आम्हा सर्वांसाठी अथक परिश्रम घेत राहिली. मला हे बदलायचे होते आणि तिला तिचे मूल्य शोधण्यात मदत करायची होती, ”रवीनाने लाइफ बियॉन्ड नंबर्सला सांगितले. त्यांनी बेसन बर्फीपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. ही बर्फी बनवून त्यांनी लोकल मार्केट मध्ये घेऊन जाऊन विकली आणि पहिल्यांदा स्वतःचे पैसे कमवले. इथून सुरु झालेल्या प्रवास आजही थांबला नाही. दरम्यान, दुसऱ्या लाटेच्यावेळी कौर यांना कोविड -१९ची लागण झाली. या आजरावरही त्यांनी मात केली.

पुन्हा एकदा आपल्या व्यवसायाकडे त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspirational story of a 90 year old grandmother who beating covid and also launched its own food brand ttg
First published on: 12-08-2021 at 13:34 IST