अमेरिकेतील सर्वात मोठ्या किराणा वितरण कंपनी Instacart चे संस्थापक अपूर्व मेहता यांनी LinkedIn वर त्यांच्या यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवासाचा किस्सा शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या डोक्यात किराणा वितरण स्टार्टअप सुरु करण्याचा विचार कसा आला याबाबतची माहिती सांगितली आहे. तर एका रिकाम्या फ्रीजमुळे आपणाला कंपनी सुरु करण्याची कल्पना कशी सुचली आणि एवढी मोठी कंपनी कशी सुरु झाली हे देखील त्यांनी सांगितले आहे.

एक कल्पना लोकांचे आयुष्य कसे बदलवू शकते, याबाबतच्या अनेक बातम्या आपण वाचत आणि पाहत असतो. अनेक मोठमोठे उद्योगपती त्यांना सुचलेल्या अनोख्या कल्पनेमुळे कसे यशस्वी झाले याबाबतही आपण ऐकत असतो. अशाच उद्योगपतींमध्ये अपूर्व मेहता यांचाही समावेश होतो. जे अमेरिकेतील सर्वात मोठ्या किराणा वितरण कंपनी Instacart चे संस्थापक आहेत. नुकतेच त्यांनी लिंक्डइनवर त्यांच्या यशस्वी प्रवासाची कहाणी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी २०१२ मध्ये त्यांना एक रिकामा फ्रिज दिसला आणि येथून त्यांच्या डोक्यात कंपनी सुरू करण्याची कल्पना आल्याचं सांगितलं.

व्हायरल पाहा पोस्ट –

https://www.linkedin.com/embed/feed/update/urn:li:share:7109960878514438145

हेही पाहा- कुत्र्याचे पोस्टर काढले म्हणून महिलेची पुरुषाला मारहाण, कॉलर पकडली, केस ओढले अन्…, VIDEO व्हायरल

Apoorva Mehta

मेहता म्हणाले माझ्या डोक्यात ही कल्पना आल्यानंतर इन्स्टाकार्ट अॅपच्या पहिल्या व्हर्जनचे कोडिंग करायला मी सुरूवात केली. शिवाय त्यावेळी मला या गोष्टीचा अंदाज नव्हता की, एक दिवस माझी कंपनी अमेरिकेतील सर्वात मोठी किराणा डिलिव्हरी कंपनी बनू शकेल. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “एक दशकापूर्वी मी सॅन फ्रान्सिस्कोमधील माझ्या अपार्टमेंटमध्ये बसलो होतो, यावेळी माझ्या फ्रिजमध्ये केवळ गरम सॉस असल्यामुळे मी दुःखी होतो. कृपया मला चुकीचं समजू नका, मला गरम सॉस आवडतो, परंतु तुम्ही जेवणात फक्त सॉस खाऊ शकत नाही.”

त्यांनी पुढं लिहिलं की, माझा रिकामा फ्रीज ही एक समस्या होती, पण प्रेरणास्रोतही होता. ते वर्ष २०१२ होते आणि मी किराणा सामान सोडून सर्व काही ऑनलाइन खरेदी करू शकत होतो. हा माझ्यासाठी डोक्यात प्रकाश पाडणारा क्षण होता आणि मी Instacart अॅपच्या पहिल्या व्हर्जनचे कोडिंग सुरू केले. आज ज्या कंपनीची सुरुवात मी माझ्या स्वयंपाकघरातून केली होती, ती कंपनी आज सार्वजनिकपणे ($CART) काम करते. Instacart तयार करणाऱ्या टीमचा मी आभारी आहे. मी आमचे कष्टकरी खरेदीदार, आमचे ग्राहक आणि CPG भागीदार या सर्वांचे आभार मानतो. तर एका रिकाम्या फ्रीजपासून अब्जावधी डॉलर्सच्या यशस्वी स्टार्टअपपर्यंतचा अपूर्व मेहता यांचा प्रवास व्यावसायिक जगात संधी शोधणाऱ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे यात शंका नाही.