Mumbai Youths Stand In Line For 21 Hours For iPhone 17: आज भारतात अॅपलच्या आयफोन १७ मालिकेची विक्री सुरू झाली असून, दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथील अॅपल स्टोअर्समध्ये प्रचंड गर्दी आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईतील बीकेसीत असलेल्या अॅपलच्या प्रमुख स्टोअरमध्ये उत्सुक ग्रहकांची मोठी गर्दी झाली आहे. याचबरोबर रांगेत उभाण्यावरून काही ग्राहकांमध्ये हाणामारीही झाल्याचे पाहायला मिळाले.
या सर्व गोंधळाच्या परिस्थितीत, एका तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तरुणाने दावा केला आहे की, तो आयफोन १७ खरेदी करण्यासाठी तब्बल २१ तास रांगेत उभा रहिला होता. तसेच तो अॅपल स्टोअरमध्ये प्रवेश करणारा पहिला व्यक्ती आहे.
विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही हा तरुणाने आयफोन १६ खरेदी करण्यासाठी १७ तास रांगेत उभा राहिला होता.
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना हा तरुण म्हणाला की, “मी खूप उत्साहित आहे.” यावेळी सुव्यवस्था राखल्याबद्दल त्याने अॅपलच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आयफोन १७ बद्दल बोलताना तो म्हणाला, “त्यामध्ये नवीन कॅमेरा सारखी बरीच नवीन वैशिष्ट्ये आहेत.”
दरम्यान, या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने म्हटले की, “हा पाहा तरुण आणि उत्साही व्यक्ती. अॅपल स्टोअरमध्ये प्रवेश करणारा पहिला व्यक्ती होण्यासाठी २१ तास रांगेत उभा राहिला होता. गेल्या वर्षीही त्याने असेच काहीतरी केले होते. तेव्हा तो १७ तास रांगेत उभा राहिला होता. याला पद्मश्री मिळायला पाहिजे!”
अॅपलने त्यांच्या नवीन आयफोन १७ मालिकेतील टॉप मॉडेल्स आयफोन १७ प्रो आणि प्रो मॅक्सची घोषणा केली आहे. यामध्ये आयफोन १७ आणि पूर्णपणे नवीन आयफोन एअर यांचा समावेश आहे. प्रो आयफोनमध्ये अॅल्युमिनियम बॉडी असून, त्याची बॅटरी क्षमता सर्वाधिक आहे.