Disabled Man Trekking Video Viral : ज्याला दोन पाय आहेत, त्यालाही कधीकधी ट्रेकिंगला जाताना भीती वाटत असेल. कारण उंच डोंगर चढायला मोठं धाडस लागतं. तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही काहीतरी भन्नाट करू शकता. पण एका तरुणाने दोन पाय नसतानी डोंगर चढण्याचा मोठा पराक्रम केला आहे. या तरुणाच्या दोन्ही पायांच्या जागेवर आर्टिफिशियल फिक्सचर लावण्यात आले आहेत. तरीही या तरुणाने मोठ्या जिद्दीने ट्रेकिंगला जाऊन डोंगर चढण्याची मोठी कामगिरी केली आहे. ट्रेकिंगचा हा जबरदस्त व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. आर्टिफिशियल फिक्सचरच्या मदतीने हा तरुण उंच डोंगरावर ज्या पद्धतीने चढत आहे, ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओ व्हायरल होताच या तरुणाच्या हिंम्मतीला नेटकऱ्यांनी सलाम ठोकला आहे.

ट्वीटरवर हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, मजबूत विल पॉवर असलेल्या व्यक्तीसाठी काहीही अशक्य नाही. तुम्ही तुमचं जीवन आणि परिस्थितीबद्दल काय विचार करता, यावर सर्वकाही अवलंबून असतं आणि तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करता हे महत्वाचं आहे. व्हिडीओत एक व्यक्ती डोंगर कड्यावर चढताना दिसत आहे. त्याला दोन्ही पाय नसतानाही आर्टिफिशियल फिक्सचरच्या मदतीने त्याने डोंगर चढण्याची जिद्द ठेवल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तो व्यक्ती डोंगरावर उंच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – काळ आला होता पण वेळा नाही! घाटात प्रवास करणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडीओ मिस करू नका

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओला ७९ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं की, आपण सामान्य परिस्थितीतही असं करण्याचा विचार करू शकत नाहीत. तर अन्य एक नेटकरी म्हणाला, मनात भीती नसेल तर खूप काही गोष्टी शिकायला मिळतात.