देशात करोनाच्या फैलावामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. जवळपास संपूर्ण देशात शाळा, महाविद्यालयं बंद आहेत. करोनामुळे मुलं ऑनलाइन शिक्षण घेतलं आहेत. त्यामुळे मुलांना शाळेचा विसर पडला आहे. त्यातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यानाही हसू आवरता येत नाही. एक शाळकरी विद्यार्थी शाळेच्या इमारतीकडून जात असताना त्याला थेट मागच्या जन्माची आठवण आली. हे ऐकून वडिलांनाही डोक्यावर हात मारावा लागला. हा मजेशीर व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि बघता बघता नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ डोक्यावर उचलून धरला आहे.

या व्हिडिओत वडील मुलाला शाळेच्या इमारतीकडून घेऊन जात असताना दिसत आहेत. तेव्हा मुलगा खिडकीबाहेर आश्चर्याने इमारतीकडे पाहत होता. तेव्हा वडिलांना त्याला विचारलं काय झालं. तेव्हा त्या मुलाने सांगितलं या इमारतीचं आणि माझं मागच्या जन्मीचं नातं आहे. तेव्हा वडिलांना कानशिलात लगावून सांगितलं ही तुझी शाळा आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनाही शेअर करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत एक संदेशही दिला आहे. “करोनाला लवकर पराभूत करणं गरजेचं आहे. नाही तर प्रकरण आणखी गंभीर होत जाईल”, असं सांगत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Tauktae Cyclone: तौक्तेनं जाग्या झाल्या भयानक ‘निसर्ग’च्या आठवणी
आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी १६ मे रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. बघता बघता या व्हिडिओ हजारो नेटकऱ्यांनी पाहिला आणि त्याला मजेशीर कमेंट्सही दिल्या आहेत.