IRCTC Ticket Booking New Rules Viral Post: लाइटहाऊस जर्नलिझमला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेली एक पोस्ट समोर आली ज्यात दावा केला आहे की रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी IRCTC ने नवे नियम लागू केले आहेत. पोस्टमध्ये नमूद केले आहे की, ‘एखादी व्यक्ती केवळ रक्ताच्या नात्यातील किंवा समान आडनाव असलेल्यांसाठी वैयक्तिक आयडी वापरून तिकीट बुक करू शकते. मित्र किंवा इतरांसाठी बुकिंग केल्यास १० हजार रुपयांचा मोठा दंड होऊ शकतो किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, किंवा दोन्ही’ भोगावे लागू शकते. यावरून प्रचंड गोंधळ होत असताना आम्ही यामागील सत्य शोधून काढले आहे .

काय होत आहे व्हायरल?

इंस्टाग्राम युजर cine_muchatlu ने व्हायरल दावा आपल्या प्रोफाइल वर शेअर केला होता.

इतर वापरकर्ते देखील हाच दावा शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही आमचा तपास एका साध्या गूगल कीवर्ड सर्चने आणि IRCTC वेबसाइट तपासून आमचा तपास सुरू केला. आम्ही IRCTC वेबसाइटवरील FAQs विभाग तपासला. १२ व्या क्रमांकाच्या प्रश्नात म्हटले आहे की मित्र आणि कुटुंबासाठी तिकिटे बुक केली जाऊ शकतात.

https://contents.irctc.co.in/en/bookmytrain.html

वेगवेगळ्या आडनावांमुळे ई-तिकीट बुक करण्यावर बंदी असल्याच्या सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बातम्या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या आहेत असेही आयआरसीटीसीने स्पष्टीकरण दिल्याचे आम्हाला आढळले.

आम्हाला त्यावर PIB फॅक्ट चेकची पोस्ट देखील आढळली.

आम्ही मध्य रेल्वेचे एमएस उप्पल यांच्याशीही संपर्क साधला, ज्यांनी व्हायरल दावा खोटा असल्याची पुष्टी केली.

हे ही वाचा<< सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाचा फोटो होतोय व्हायरल? सानियाच्या वडिलांनी दिलेलं स्पष्टीकरण आधी वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: कुटुंबातील नसलेल्या लोकांसाठी IRCTC तिकीट बुकिंगचे नवीन नियम तुम्हाला तुरुंगात टाकणार नाहीत. व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.