सोशल मीडियावर सतत विविध आणि भन्नाट जुगाडाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहिल्यानंतर आपण अनेकदा ते बनवणाऱ्याच्या बुद्धीला सलाम करत असतो. सध्या अशाच एका जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल शिवाय तो बनवणाऱ्याच्या बुद्धीचे कौतुकही कराल यात शंका नाही.

हो कारण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओमध्ये, ट्रॅक्टरपासून बाईक बनवली आहे की, बाईकपासून ट्रॅक्टर बनवला आहे, हेच अनेकांना ओळखता येत नाहीये. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी, “भारताला आणखी किती महान बनवणार आहात??” अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी हा खरा बुलेट लव्हर असल्याचं म्हटलं आहे. तुम्हीदेखील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आश्चर्यचकीत व्हाल यात शंका नाही.

बुलेटवाला मिनी ट्रॅक्टर –

हेही पाहा- देवाच्या दारात सैतानी कृत्य! केदारनाथ यात्रेदरम्यान घोड्याला जबरदस्ती सिगारेट ओढायला लावली अन्…, संतापजन Video व्हायरल

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या जुगाडू ट्रॅक्टरचा व्हिडिओ मध्य प्रदेशातील असून तो @sureshvasuniyamadhya नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये, ट्रॅक्टरच्या बोनेट आणि इंजिनाच्या जागी बुलेटची बॉडी जोडल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओतील ट्रॅक्टरची खालची चार चाके आणि छत आणि इतर लूक हा सामान्य ट्रॅक्टर प्रमाणेच आहे, परंतु वरचा भाग पाहिल्यावर तो चारचाकी हिल बाईक असल्याचा भास होतोय, कारण पुढे बाईकचा हॅंडल आणि पेट्रोलची टाकी दिसत आहे. शिवाय सामान्य ट्रॅक्टरप्रमाणेच या बुलेट ट्रॅक्टरच्या मागे एक छोटी ट्रॉली जोडल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

या अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ ६ जून रोजी शेअर करण्यात आला आहे,जो आतापर्यंत २१ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला तर तो ३ लाख ८५ हजार लोकांनी लाईक केला आहे. अनेकांनी याव्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ही बुलेट बाईक आहे. तर दुसर्‍याने लिहिलं, “भारतीय जुगाड भन्नाट असतात.”