Jethalal Happy Diwali Song: देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. भारताच्या प्रत्येक भागात दिव्यांचा हा सण मोठ्या साजरा केला जात असून हा सण भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी हा पाच दिवसांचा भारतीय सण, सण-उत्सवाच्या परंपेतील सर्वात मोठा सण आहे. धनत्रयोदशीपासून सुरू होणाऱ्या या सणाचा दुसरा दिवस म्हणजे छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशीही म्हणतात. वसुबारस पासून दिवाळीची सुरुवात झाली. धनत्रयोदशी झाली. आता नरक चतुर्दशी. दिवाळीची पहिली पहाट, पहिली अंघोळ. त्यानिमित्ताने तुम्हीही तुमच्या मित्र मैत्रीणींना दिवाळीच्या शुभेच्छा देणार असालच तर जेठालालच्या स्टाईलमध्ये शुभेच्छा देऊन दिवाळी आणखी स्पेशल कराल. तारक मेहता का उल्टा चष्मा या हिट कार्यक्रमामधील जेठालालचे हॅपी दिवाळी गाणे गाताना जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे गाणा ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल तसेच ज्याला पाठवाल त्याच्याही चेहऱ्यावर हसू येईल.

दिवाळीनिमित्त मित्र-परिवाराला द्या जेठालाल स्टाईल हटके शुभेच्छा

या व्हिडीओ शिवाय तुमची दिवाळी सुरूच होऊ शकत नाही. किंबहूना दिवाळी म्हटलं की हा व्हिडीओ कुठल्या ना कुठल्या मार्गानं तुमच्या डोळ्यांसमोर येईलच. अन् हो, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू देखील आवरणार नाही. सध्या दिवाळीचे सेलिब्रेशन चालू आहे आणि जेठालालच्या हॅप्पी दिवाळी गाण्याच्या व्हिडीओने पुन्हा सोशल मीडिया फीड्सवर कब्जा केला आहे. जेठालाल या पात्राचा कोणताही व्हिडीओ असो तो नेहमी हीट होतोच असाच हा व्हिडीओ इतक्या वर्षांनीही प्रत्येक दिवाळीला हीट होतोच. तुम्हीही दिवाळीनिमित्त तुमच्या मित्र-परिवाराला द्या जेठालाल स्टाईल हटके शुभेच्छा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Diwali Wishes 2024 : दिवाळीच्या द्या प्रियजनांना हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज

खरं तर ही व्हिडीओ क्लिप तारक मेहता का उल्टा चष्मा या विनोदी मालिकेतील ७२७ व्या एपिसोडमधील आहे. या भागात जेठालालच्या घरी गोकूळधाम सोसायटीमधील त्याचे मित्र त्याला दिवाळीच्या शुभेच्या देण्यासाठी येतात. त्यावेळी घडलेलं गंमतीशीर संभाषण या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता. लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओ क्लिपला जवळपास १० वर्ष उलटून गेली आहेत. मात्र अनेकजण सोशल मीडियाद्वारे दिवाळीच्या शुभेच्या देताना सोबत हा व्हिडीओ आवर्जून पाठवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

h