Job Search Post On Reddit: रेडिटवर एका ३१ वर्षीय युजरने तो सध्या आयुष्यात किती कठीण परिस्थितीत आहे, याचा अनुभव शेअर केला आहे. “३१ व्या वर्षी हरलो. ४० लाखांचे मोठे कर्ज आहे. नोकरी नाही. ही परिस्थिती मी कशी बदलू? या शीर्षकाच्या पोस्टमध्ये युजरने कित्येक प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसल्याचा अनुभव सांगितला आहे.
रेडिट पोस्टमध्ये काय आहे?
या तरुण युजरने त्याच्या सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख करून पोस्टची सुरुवात केली, “मी नुकतेच अमेरिकेतून माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे मी भारतात परत आलो आहे.”
पोस्टमध्ये पुढे या तरुणाने त्याला नोकरी मिळवण्यासाठी येत असलेल्या अडचणींकडे लक्ष वेधले आहे. तो म्हणाला, “मला अमेरिकेत नोकरी मिळाली नाही आणि भारतीय बाजारपेठ थोडीशी मंदीत असल्याचे दिसत आहे, सगळीकडून नकार मिळत आहेत.”
एक छोटासा धक्का बसल्याने…
३१ वर्षांच्या या युजरने पुढे सांगितले की, “एक छोटासा धक्का बसल्याने मी २०२२ च्या शेवटी काम करणे थांबवले, परत एकदा शिक्षणाकडे वळण्याचा निर्णय घेतला, काही प्रगत डिप्लोमाचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि २०२३ च्या शेवटी माझ्या मास्टरसाठी अमेरिकेत गेलो.”
रेडिटवर पोस्ट करणाऱ्या या युजरकडे डेटा विश्लेषक म्हणून सहा वर्षांचा कामाचा अनुभव आहे, त्याला वर्षाला सुमारे ६ लाख रुपये पगार होता. “आता भारतीय कंपन्या मला माझ्या मागील पगाराच्या आधारावर कमी कमी पगाराच्या ऑफर्स देत आहेत.”
अनेक महिन्यांपासून मी या चक्रात अडकलो आहे
मला चांगला पगार, अनुभव आणि उत्तम करिअरसाठी डाटा विश्लेषण करणाऱ्या अव्वल कंपन्यांमध्ये नोकरी मिळवायची आहे. जी नोकरी मला आवडते तिथे, माझी कौशल्ये जुळत नाहीत. मग पुन्हा जाऊन ती मला शिकावी लागतात, तोपर्यंत ती संधी गेलेली असते. गेल्या अनेक महिन्यांपासून मी या चक्रात अडकलो आहे. मला ही परिस्थिती बदलायची आहे, पण कशी बदलायची याची मला काहीच कल्पना नाही”, असे या तरुणाने पोस्टमध्ये म्हटले आहे.
कर्ज फेडणे ही सर्वात मोठी…
दरम्यान, रेडिट या प्लॅटफॉर्मवर या तरुणाच्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. यानंतर अनेकांनी या युजरला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले दिले आहेत.
एका युजरने तरुणाला सल्ला दिला की, “आता चांगली नोकरी मिळवणे हेच तुमचे प्रमुख प्राधान्य असावे. शक्य असल्यास रेफरल्सचा वापर करा, जे मदत करू शकतात अशा सर्वांपर्यंत पोहोचा, पण गरजू असल्यासारखे दाखवू नका. तसेच, इंडस्ट्रीमधील लोकांना लिंक्डइनवर फॉलो करा, जेणेकरून नवीन संधींबाबत माहिती मिळत राहील.”
या युजरने तरुणाला हेही सुचवले की, “एकदा नोकरी लागल्यानंतर कर्ज फेडणे ही सर्वात मोठी प्राधान्याची गोष्ट असावी.”
दुसरा मार्ग नाही
दुसर्या एका युजरने म्हटले की, “मी सुद्धा तुम्ही ज्या परिस्थिती आहात, त्याच परिस्थितीत आहे. आपल्यासमोर एकमेव पर्याय म्हणजे पुन्हा अप-स्किल करणे हेच आहे. मला माहित आहे की तू थकला असशील, परंतु दुसरा कोणताही मार्ग नाही. आपल्याला आपल्या कौशल्यांमध्ये अधिक चांगले होणे आवश्यक आहे.”