Viral news: संघर्षाच्या काळात प्रत्येकाला निःस्वार्थी सोबती हवा असतो. या काळात अशा माणसाची खरी गरज असते, जो आपल्या सोबत उभा राहील. मात्र, प्रत्येकालाच संघर्षाच्या काळात संयमाने सोबत उभा राहणारा जोडीदार, सोबती मिळतोच असं नाही. असंच काहीसं या तरुणाच्या बाबतीत झालं. गर्लफ्रेंडला शिकवलं आयएएस अधिकारी केलं आणि त्यानंतर ती त्याला सोडून गेली. यानंतर या तरुणानं असं काही केलं की तुम्हीही अवाक् व्हाल. अपमानाचा प्रत्येकालाच सामना कधी ना कधी करावा लागतो. कधी आपली चूक नसताना तर कधी आपली चूक झाली म्हणून अपमान सहन करावा लागतो. त्या क्षणी जरी अपमान गिळत असलो तरी झालेला अपमान कुणीही विसरत नाही. काही जण चुकीच्या मार्गाने याचा बदला घेतात, मात्र यश संपादन करणं हाच सगळ्यात मोठा बदला आहे; हे तर साऱ्यांनाच मान्य असेल. मात्र या तरुणानं काय केलं हे तुम्हीच पाहा. मात्र या तरुणानं प्रेयसीवर एक पुस्तक लिहून आपल्या सूडाची आग विझवली आहे.

“ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतेकाम देखेगी” हे गाणे तुम्ही ऐकलेच असेल. शादी में जरूर आना चित्रपटातील हे गाणे अनेक ह्रदय तुटलेल्या प्रेमींसाठी प्रेरणादायी आहे. अशीच एक घटना राजस्थानच्या जोधपूरमधून समोर आली आहे, जिथे एका महिलेने आपल्या प्रियकराला आयएएस अधिकारी झाल्यावर सोडून दिले. यानंतर मुलाने जे केले ते आश्चर्यचकित करणारे होते.

प्रेमभंग झाल्यामुळे लिहिलेले पुस्तक

हे प्रकरण जोधपूरच्या लोहवत गावातील शेतकरी कुटुंबाशी संबंधित आहे. या कुटुंबाचा मुलगा कैलास मंजू काही दिवसांपासून चर्चेत आहे. या शेतकरी कुटुंबातील मुलगा कैलाश याने यूपीएससी वाला लव्ह कलेक्टर साहिबा नावाचे पुस्तक लिहिले आहे. झाले असे की, मुलीने प्रियकर कैलासला IAS होताच सोडून दिले. म्हणून त्या मुलाने यावर एक पुस्तक लिहिले.

दिल्लीत परीक्षेची तयारी सुरू असताना मुलगा मुलीच्या संपर्कात येतो, तिथे त्यांची मैत्री होते आणि ते प्रेमात पडतात. दरम्यान, असे होते की, मुलगी यूपीएससीमध्ये क्लिअर होते आणि ती हळूहळू मुलापासून दूर जाते. ही संपूर्ण कथा या पुस्तकात लिहिली आहे आणि हे पुस्तक सध्या बेस्ट सेलर आहे.

पाहा पोस्ट

हेही वाचा >> “सावकाश ये भावा, मालक…” ट्रकच्या मागे लिहली भन्नाट पाटी; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कैलाश मंजू सांगतात की, हार्टब्रेक झाल्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. हे पुस्तक स्वयंप्रकाशित आहे आणि त्यामुळे कैलासला लाखो कोटींचा नफा मिळत आहे. कैलाशच्या मते, हे पुस्तक सध्या हिंदी भाषेत बेस्ट सेलर आहे. मात्र, आता हे पुस्तक प्रकाशनासाठी देण्यात आले असून ते आता मराठी, गुजराती आणि इंग्रजीमध्ये छापण्याची तयारी सुरू आहे.