Monsoon Jugaadu Ideas: पावसाळ्यात कपडे सूकत नाहीत अशावेळी घरात सगळीकडे फॅन असावे अशी इच्छा तुमच्याही मनी आलीच असेल ना? पण मुळात एका फॅनचं बिल भरमसाठ येत असताना आणखीन फॅन लावणे म्हणजे खिशाला कात्री हे ही गणित डोक्यात फिरत असतं. अशावेळी, एकाच फॅनच्या बिलामध्ये तीन फॅन सुरु राहिले तर? तुम्ही म्हणाल, काय मस्करी आहे? पण अशी कमाल खरोखरच एका पठ्ठ्याने केली आहे. बिहारच्या एका इंजिनिअरचा हा भन्नाट जुगाड नेटकऱ्यांना प्रचंड आवडलेला आहेच शिवाय त्याच्या हुशारीचे सुद्धा अनेकजण कौतुक करत आहेत. नेमकं हे त्याने कसं काय शक्य केलं चला पाहूया…
‘शैलेंद्र बिहारी’ या हँडलवरून पहिल्यांदा ३ जुलै रोजी हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – बिहारचे इंजिनिअर्स हे एकमेव इंजिनिअर्स आहेत जे एका मोटारवर तीन पंखे चालवू शकतात. या भन्नाट जुगाडाला आतापर्यंत ६७ हजार लाईक्स आणि अडीच हजारांहून अधिक शेअर्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी कमेंटही केल्या आहेत.
हे ही वाचा<< लोकलमध्ये असं भांडण कधीच पाहिलं नसेल! बायकांनी चप्पला, बुक्क्यांनी हाणामारी करताना लहानग्यालाही…
अशा प्रकारचे अनेक व्हायरल जुगाड हेच पुढे जाऊन एखाद्या नव्या उत्पादनाच्या निर्मितीचे मूळ ठरत असतात. म्हणूनच अनेक व्यावसायिक व प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा अशा हजुगाडूनच्या कलेचे विशेष कौतुक करत असतात. बिजनेस टायकून आनंद महिंद्रा यांच्या पेजवर यापूर्वी अनेकदा असे जुगाडू कलाकार पाहायला मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी पंख्याला ओढणी बांधून कुल्फी बनवणारी महिला त्यानंतर विहिरीतून पाणी काढण्यासाठी केलेला जुगाड असे अनेक प्रकार व्हायरल झाले होते. त्यात या तीन पंख्यांचे नाव सुद्धा आता जोडले गेले आहे.