scorecardresearch

दोरीच्या उड्या मारताना महिला अचानक घुसली लाकडी प्लॅटफॉर्मध्ये; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

व्हिडीओत महिला बंदराच्या प्लॅटफॉर्मवर उड्या मारत होती. दरम्यान फळी कमकुवत झाल्याने महिलेला अंदाज आला नाही आणि ती काही सेंकदात आत घुसली.

Viral_Video
दोरीच्या उड्या मारताना महिला अचानक घुसली लाकडी प्लॅटफॉर्मध्ये; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

समुद्रकिनारी किंवा नदीजवळ लाकडी प्लॅटफॉर्म बांधलेले असतात. किनाऱ्यावर गर्दी झाली की लोकं या प्लॅटफॉर्मवर फिरताना दिसतात. अनेक जण या लाकडी प्लॅटफॉर्मवर व्यायामही करतात. थायलंडमधील दोरी उड्या मारण्याऱ्या महिलेचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिला बंदराच्या प्लॅटफॉर्मवर उड्या मारत होती. दरम्यान फळी कमकुवत झाल्याने महिलेला अंदाज आला नाही आणि ती काही सेंकदात आत घुसली. सुदैवाने तिने प्लॅटफॉर्मच्या वरच्या भागाला हात पकडला आणि पडण्यापासून वाचली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ थायलंडच्या रचाबुरी प्रांतातील आहे. येथे १७ जानेवारीला ४४ वर्षीय बेंजरत पुट्टाखुन नदीच्या बंदरावर बनवलेल्या प्लॅटफॉर्मवर दोरी उड्या मारत होती. यादरम्यान प्लॅटफॉर्मचा काही भाग ढसला आणि ती सरळ आत घुसली. या घटनेचा व्हिडिओ योगायोगाने रेकॉर्ड झाला. कारण बेंजरत त्यांच्या मोबाईलमध्ये व्यायाम करतानाचा व्हिडिओ चित्रित करत होत्या.

सुदैवाने बेंजरत यांना मोठी दुखापत झाली नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की पडल्यानंतर तिने प्लॅटफॉर्मचा वरचा भाग दोन्ही हातांनी कसा पकडला. त्यानंतर तिने लोकांकडे मदतीची याचना करताना दिसते. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले आणि तिला बाहेर काढले. या अपघातात बेंजरत यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.फक्त त्यांच्या कोपराला ओरखडे पडले आहेत. दुसरीकडे, प्लॅटफॉर्म तोडल्याबद्दल बंदर मालकाने त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेतली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jumping rope the woman suddenly went inside the wooden platform viral video rmt