मजा मस्तीमध्ये अनेकदा गाढ झोपेत असलेल्या व्यक्तीला मेल्यासारखं झोपल्याचं म्हटलं जातं. तर कधी कधी मृत व्यक्ती देखील जिवंत झाल्याच्या गोष्टी समोर आल्या आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा आश्चर्यकारक व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. या व्हिडीओमध्ये एका कबरीमधून चक्क जिवंत व्यक्ती बाहेर निघालेला दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील हे मात्र नक्की.

कब्रस्तानातून जिवंत माणूस बाहेर आला तर? असाच भयंकर प्रकार सध्या घडलाय. एका कबरीमध्ये व्यक्ती जे काही करताना दिसते ते पाहिल्यानंतरही कदाचित तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा चकित करणारा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला असून मोठ्या संख्येने लोकांनी त्याला लाइकही केले आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की तीन लोक एका कबरीजवळ आले आणि कबर खोदण्यास सुरुवात केली. यामध्ये एक माणूस फावड्याने कबरीवरील माती काढताना दिसतो. त्यानंतर फॉइल आणि वर ठेवलेली लाकडी फळी काढली जाते. काही लोक कबरीवर ठेवलेल्या फळ्या एकामागून एक काढत आहेत. तर दुसरी व्यक्ती कॅमेरात ही सर्व प्रकार रेकॉर्ड करत आहे.

कबरीवरील फळ्या काढल्यानंतर आत जे काही दिसले ते कोणालाही आश्चर्यचकित करण्यासाठी पुरेसे आहे. कबर खोदली तर त्यात जे काही दिसूम आलं ते थक्क करणारं आहे. या कबरीमध्ये एक जिवंत व्यक्ती आरामात बसलेली दिसून आली. चादर घालून तो बेडवर आरामात बसला आहे. जेव्हा कबर उघडली तेव्हा तो माणूस स्वतः उठला आणि त्यातून बाहेर आला. व्हिडीओतील हे दृश्य कोणालाही आश्चर्यचकित करेल.

आणखी वाचा : घरट्याजवळून जाणाऱ्या महिलेवर बदकाने अचानक केला हल्ला, मग काय झालं, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नागिन डान्सनंतर आता मार्केटमध्ये आला ‘आर्मी’ डान्स, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर giedde नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आलाय. यावर नेटिझन्स जोरदार कमेंट करत आहेत. एका कमेंटमध्ये लिहिले होते की, “तुम्ही नरकात काय करत होते.” दुसऱ्या एका युजरने म्हटलंय की, “ते खेळाडू आहेत आणि असे खेळ दाखवतात.” एका युजरने म्हटले की, “सायकलवाले जादूगार.”