सध्या सोशल मीडियावर कच्चा बादाम हे गाणं प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचं ‘कच्चा बादाम’ हे गाणं झालं होतं. खरतरं हे गाणं पश्चिम बंगालमधील शेंगदाणा विक्रेता भुबन बड्याकरने गायलं आहे. त्यानंतर त्या गाण्यावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. यानंतर भुबन बड्याकरच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली. तर काही दिवसांपूर्वीच त्याचा अपघातही झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर भुबनने माफी मागितली आहे.

जेव्हा भुवनला लोकप्रियता आणि पैसा मिळायला सुरुवात झाली तेव्हा मात्र लोकांनी त्याला नावं ठेवण्यास सुरुवात केली होती. नेटकऱ्यांनी भुबनला ट्रोल केल्यानंतर त्यानं काही गोष्टींबाबत कबुली दिली आहे. त्याने आपल्याला जी लोकप्रियता मिळाली त्यातून आपली सारासार विचार करण्याची बुद्धी हरपल्याचे भुबननं सांगितलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही देखील त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता मला कळून चुकले आहे मी तेव्हा थोडा वाहून गेलो होतो. त्याबद्दल नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी शक्य असल्यास मला माफ करावे. मी आता पुन्हा पहिल्यासारखा जगू लागलो आहे.

आणखी वाचा : आराध्याने साकरली सीतेची भूमिका, राम नवमीच्या आधी फोटो झाले व्हायरल

आणखी वाचा : ३० वर्षांनंतर शनि करणार आवडत्या राशीत प्रवेश, या ४ राशींवर लक्ष्मी देवी करणार धनवर्षाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे भुबन म्हणाला, “मी आता कुणी सेलिब्रेटी नाही. गरज पडल्यास पुन्हा शेंगा विकेन. पण तसं वागणार नाही. लोकप्रियतेच्या हव्यासापोटी काही गोष्टी माझ्याकडून चुकल्या. त्याचा फटका मलाही बसला. मी काही दिवसांपूर्वी गाडी खरेदी केली होती. पण हे सगळं व्यर्थ आहे. जीवनाचा खरा अर्थ कशात आहे हे मला कळलं आहे. आतापर्यत प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. हे जास्त महत्वाचं आहे. त्यांच्या प्रेमाशिवाय एवढे काही शक्य नव्हते. फक्त बंगालच नाहीतर भारताच्या कानाकोपऱ्यातून मला लोकांचं प्रेम मिळालं. एका साध्या गावातील शेंगा विकणारा भुबन हा मीडियासमोर आला. लोकप्रिय झाला. त्यावेळी मी जर चुकलो असेल तर माफी मागतो. असेही भुवननं म्हटलं आहे.”