Kalu waterfall viral video: सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात. या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात. काही पर्यटक तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात. पण, असे साहस काही वेळा पर्यटकांच्या चांगलेच जीवावर बेतते. अशा घटना पाहता वारंवार सांगितले जाते की, पाण्याशी कधी खेळू नका. तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता, धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. अशाच पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो काळूवॉटरफॉलला फिरण्यासाठी गेला होता मात्र नसतं धाडस त्याच्या जीवावर बेतलं आहे. धबधब्याचं पाणी अचानक वाढलं अन् काळू वॉटरफॉलवर तरुण मधोमध अडकला त्यानंतर काय घडलं तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून धबधब्यावर जाताना शंभर वेळा विचार कराल.
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर येथील प्रसिद्ध काळू धबधब्याच्या टॉप पॉईंटवर ही घटना घडली.. प्रसिद्ध काळू धबधबा हा पाच टप्यात खोल दरीत कोसळत असतो. त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी म्हणजेच टॉप पॉईंटवर एक पर्यटक हा पाय घसरून पडला होता. खाली २०० ते ३०० फूट खोल दरी आणि हा तरुण काळू नदीच्या अतिवेगवान वाहणाऱ्या पाण्याच्या टोकावर अडकला होता. मृत्यूच्या दारातच अडकलेला हा तरुण कधीही पाण्याबरोबर खाली वाहून जाऊ शकत होता. मात्र काही तरुणांनी थरारक रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला वाचवलं आहे. याचा व्हिडीओही व्हायर होत असून व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल.
पर्यटनस्थळावर रिल्ससाठी स्टंटबाजी करण्याच्या नादात कार ३०० फूट दरीत कोसळण्याची घटन साताऱ्यात घडली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातील जुन्नर येथील काळू धबधब्यावर एका विचित्र घटना घडली आहे. जवळपास २०० ते ३०० फूट खोल धबधब्याच्या टोकावर एक तरुण अडकला होता. सुदैवाने या तरुणाचाल वाचवण्यात आलं. पण, त्याच्या या कृत्यामुळे वाचवल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याच्या कानशिलात लगावून परत असं न करण्याची ताकीद दिली.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ kiran_sabale_vlogs_official नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, जुन्नर तालुक्यात फिरायला येताय तर एक जबाबदार पर्यटक म्हणून या,काळू धबधब्यावर एक दुर्घटना होता होता राहिली आपल्या जिवाची काळजी घ्या मित्रांनो…असं आवाहन केलं आहे.