Viral video: रस्त्यावर खड्डे काही आपल्यासाठी नवे नाहीत. मुंबईच्या रस्त्यांवर कशा पद्धतीने खड्ड्यांचं साम्राज्य आहे हे आपल्याला माहितीच आहे.मुंबईचे रस्ते आणि खड्डे हे एक वेगळंच समीकरण आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. पण या राजधानीमधील रस्ते पाहिले तर कदाचित खेडेगावातील रस्ते त्या तुलनेत चांगले आहे अस म्हणता येईल. अर्थात हे रस्ते दुरूस्त व्हावे यासाठी मुंबईकरांनी आजवर अनेकदा आवाज उठवले आहेत. अगदी मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा या प्रकरणी महानगरपालिकेवर टीका केली आहे.पण त्यानंतर तात्पुरते रस्ते दुरुस्त होतात आणि पाऊस पडताच पुन्हा खड्डे दिसू लागतात. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सारंग साठ्ये याने केलेली स्टँडअप कॉमेडी सध्या व्हायरल होत आहे. यावेळी खराब रस्त्यांची सारंग साठ्येनं चांगलीच पोलखोल केलीय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीलाच तो खड्ड्यांवरून टोमणा मारताना म्हणतो, “शेवटचा शो डोंबिवलीमध्ये करतोय, कारण शिळफाट्याला गेलेला माणूस परतच येत नाही.” पुढे तो म्हणतो, “डोंबिवलीत मेट्रो येतेय का? त्यांना म्हणाव थांबा खड्डे खणू नका दोन पावसाळे होऊदेत अख्खं अंडरग्राऊंडच तयार होईल.मग आपण यातूनच एक जलमार्ग तयार करू..” असे आणि आणखीही विनोद करत चांगलेच टोले सारंग साठ्येनं लगावत खराब रस्त्यांची पोलखोल केली आहे.

नागरिकांना चांगले रस्ते आणि पदपथ उपलब्ध करणे हे नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. परंतु, खड्डे दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुरावस्था कायम असल्याचं वारंवार पाहायला मिळतं

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ things2doindombivli_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.यावर आता लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “डोंबिवलीतल्या राजकारण्यांनी जरा मनावर घेऊन काम करा आता तरी.” एकच नंबर बरोबर आहे, कितीही बोललो तरी खड्डे पडणारच पावसाळ्यात अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे. यावेळी कॅप्शनमध्येही, “भाडिपाच्या शोमध्ये डोंबिवलीचा सामाजिक मुद्दा @bhadipa खूप धन्यवाद ह्याने तरी आमच्या इकडच्या राजकारण्यांना जाग येईल,” असं म्हंटल आहे.