Kalyan local viral video: दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलनं प्रवास करतात. कमी वेळात, परवडणाऱ्या दरात दूरवरचे अंतर कापण्यासाठी रेल्वे प्रवास मुंबईकरांसाठी वरदान ठरतोय. पण या प्रवासाला अपघाताचा श्राप लागलाय. त्यामुळे मुंबई लोकलचा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरु लागल्याचे चित्र समोर येतंय. विशेषतः मध्य रेल्वेवर रोज अपघात होत आहेत. यात कोणाचा जीव जातो तर कोणी जखमी होतानाचे वृत्त समोर येते. रेल्वे प्रशासन मात्र अजूनही यावर कायमस्वरूपी तोडगा काढत नाही. रेल्वेच्या अनेक योजना आहेत. पण त्या प्रत्यक्षात कधी उतरणार? असा प्रश्न आता प्रवासी विचारतायत.

मुंबई लोकलच्या प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. महिलांचा जीवघेणा प्रवास पाहून हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सकाळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसात जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोकलच्या मागे जीव मुठीत धरून धावतो आणि लोकलमध्ये चढतो. काही मंडळी अक्षरश: पूर्ण ताकत एकवटून डब्यात शिरण्याचा प्रयत्न करतात. पण, खरंच आयुष्यापेक्षा नोकरी महत्वाची आहे का? तर मुंबईकरांनो कोणतीच गोष्ट तुमच्या जीवापेक्षा मोठी नाही. त्यामुळे पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल, पण असा जीवघेणा प्रवास नको.

कल्याण रेल्वे स्टेशनवर लेडिज स्पेशल ट्रेन ४० मिनिटं लेट झाली आणि ट्रेनमध्ये इतकी गर्दी झाली की महिला प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करू लागले. आपला जीव मुठीत धरून महिला प्रवासी ट्रेनने प्रवास करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडीओ पाहूनतुम्हालाही धडकी भरेल.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबईच्या लोकलमधील महिलांचा हा डबा आहे. या महिलांच्या डब्यात खच्चून गर्दी आहे. इतकी गर्दी आहे की, पाच-सहा महिला अक्षरश: लोकलच्या बाहेर लटकत आहेत. या महिला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. यातील एका महिलेने थोडीशी जरी हालचाल केली तरी सगळ्या लोकलमधून पडण्याची शक्यता आहे. एवढी रिस्क घेऊन या महिला प्रवास करत आहेत. 

पाहा व्हिडीओ

मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेली लोकल मृत्यूचा सापळा बनत आहे. त्यामुळे तुम्हीही मुंबईकर असाल तर प्रवास करताना स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. कारण आपल्या जीवापेक्षा मोठी कोणतीच नोकरी नाही किंवा काम नाही. हा व्हिडीओ @mumbairailusers या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.