Kasba Bypoll Election Result 2023 : पुण्यातील बहुचर्चित कसबा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाने प्रतिष्ठा पणाला लावूनही अखेर पराभवाचा सामना केला. महविकासआघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या पराभवाचे विश्लेषण करू असा पवित्रा घेतला आहे. कसब्यात हेमंत रासने यांचा पराभव व धंगेकरांचा विजय, बिचूकलेंना मिळालेली ४७ मतं या एकूण पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होत आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत रासने यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप झाला होता यावरही नेटकरी मीम शेअर करून मजा घेत आहेत. पुणेकरांच्या मीम पेजवर झळकणाऱ्या काही मजेशीर कमेंट्स पाहु या..

कसबा पोटनिवडणूक मीम्स

(फोटो सौजन्य: फेसबुक)

दरम्यान, कसब्यातील पराभवानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल प्रतिक्रिया देत “कसब्यात ज्या काही चुका, त्रुटी, उणिवा असतील त्या शोधून दुरुस्ती केली जाईल. पुन्हा एकदा कामाच्या माध्यमातून कसब्याच्या मतदारांची मनं जिंकली जातील. त्यामुळे मी कसब्यातील मतदारांनाही धन्यवाद देतो,” असं म्हंटलं आहे. तर हेमंत रासने यांनी सुद्धा माझ्यावर पैसे वाटपाचा आरोप झाल्याचा फटका बसल्याचे मत व्यक्त केले आहे.