द काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा व्यथा समोर आल्या आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. लोकांना हा चित्रपट खूप आवडला असून आयएमडीबीवर १० पैकी १० रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून यात अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि इतर अनेक कलाकारांनी अभिनय केला आहे. दरम्यान या चित्रपटामुळे राजकारणाला देखील ऊत आला आहे. त्यामुळे अनेक पक्षांनी या चित्रपटाच्या निमित्ताने केंद्रातील सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी या चित्रपटावर टीका केली आहे. तर शिवसेना खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काश्मिरी पंडितांनी व्यक्त केलेल्या भावनांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काश्मिरी पंडीत असलेल्या युवकाने शिक्षणासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

“काही गोष्टी लोकांच्या समोर आल्या नाहीत. राजकीय भाषेत बोलायचं झालं तर त्या वेळेस कोणतं सरकारच नव्हतं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि तेव्हा राज्यपालांकडे कोणता पर्याय नव्हता. आम्हाला जम्मूत स्थलांतरीत करण्याशिवाय पर्यात नव्हता. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे आभारी आहोत. त्यांच्यामुळेच आज ९० काश्मिरी पंडीत सुशिक्षित आहेत. इंजिनिअर आहेत. आम्हाला इथे जे काही आरक्षण आहे, त्याचं संपूर्ण श्रेय बाळासाहेबांना जातं. त्यांच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात राहणं शक्य झालं”, अशा भावना या व्हिडीओत काश्मिरी पंडीत असलेला विद्यार्थी व्यक्त करताना दिसत आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर लालकृष्ण आडवाणींना अश्रू अनावर? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, “जम्मु काश्मीरमध्ये मुस्लीम दहशवादाला बळी पडलेल्या हिंदुंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त करावा”, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्यास, मुस्लीम दहशतवाद्यांनी जम्मु काश्मीर येथील हिंदु समाजावर अत्याचार केल्याचे खरे चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला लवकर पाहता यावा यासाठी करमुक्त करावा ही विनंती, असे आवाहन त्यांनी केलं आहे.