छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती १४’ हा शो दिवसेंदिवस मनोरंजक होत आहे. या शोच्या आगामी एपिसोडमध्ये होस्ट अमिताभ बच्चन सोमवारी डॉ. ऐश्वर्या रुपारेलचं हॉटसीटवर स्वागत करणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो व्हायरल होत आहे. डॉ. ऐश्वर्याचं लग्न जमलंय आणि ती पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात लग्न करणार आहे. याबद्दल अमिताभ यांनी तिला लग्नाला उशीर का करत आहेस, असा प्रश्न विचारला आणि उपस्थित प्रेक्षक हसायला लागले.

हेही वाचा – KBC मध्ये एक कोटी रुपयांसाठी स्पर्धकाला विचारण्यात आला ‘हा’ प्रश्न; तुम्हाला उत्तर माहितीये का?

सोनीने केबीसीच्या नव्या एपिसोडचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये हॉटसीटवर स्पर्धक ऐश्वर्या रुपारेल दिसत आहे. “@ajeeb_ladkii जी, आता चिंता करू नका, कारण आता अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय त्यामुळे तुमचं दातांचं क्लिनिक चांगलं चालेल, असं कॅप्शन सोनीने हा व्हिडीओ शेअर करताना दिलंय. एपिसोडमध्ये अमिताभ तिची डॉक्टर म्हणून ओळख करून देतात. “जेव्हा तुमच्या नावासमोर डॉक्टर लागतं, तेव्हा आम्हाला भीती वाटते की तुम्ही इथे काय कराल,” असं अमिताभ म्हणाले.

हेही वाचा – KBC: रामायणाबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने स्पर्धकाने सोडला खेळ, जाणून घ्या काय होता प्रश्न

पुढे अमिताभ तिला प्रश्न विचारतात. ‘तुम्ही कशाच्या डॉक्टर आहात,’ असं विचारल्यावर ऐश्वर्या डेंसिस्ट असल्याचं सांगते. त्यावर अमिताभ म्हणतात, ‘तुम्ही तेच ना जे पेशंटला एका खुर्चीवर बसवता. मग एक अवजार घेता आणि आणि मग ते पेशंटच्या तोंडात टाकता.’ त्यावर ऐश्वर्या म्हणते, ‘सर तो आवाज तर असाच असतो, तुम्ही त्या आवाजाला आणि मशिनला घाबरायची गरज नाही.’ नंतर अमिताभ म्हणतात, आता मी म्हटलंय तर तुमचं क्लिनिक चांगलं चालेल, काळजी करण्याची गरज नाही. त्या दोघांच्या या बोलण्यावर प्रेक्षक जोरात हसू लागतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नंतर प्रोमोमध्ये, स्पर्धक ऐश्वर्या तिच्या होणाऱ्या पतीची ओळख अमिताभ बच्चन यांच्याशी करून देते आणि जानेवारी महिन्यात दोघांचं लग्न होणार असल्याचं सांगते. यावर अमिताभ आश्चर्य व्यक्त करतात आणि म्हणतात की, ‘तुम्ही ठरवलंय ना लग्न याच्याशीच करायचं, सगळीकडे सोबतही जाता मग तुम्ही लग्नाला उशीर का करत आहात’, त्यावर ऐश्वर्या म्हणते की ‘तुम्ही म्हणत असाल तर आम्ही लग्न आधीच करू,’ त्यावर अमिताभ ‘करून घ्या’ असं म्हणतात.