एका व्यक्तीसारख्या दिसणाऱ्या जवळपास ७ व्यक्ती असतात. त्यातील २ ते ३ व्यक्ती आपल्याला भेटतात, अशा काही कथा आपण ऐकतो. पण केरळचे रहिवासी असलेले एम.पी. रामचंद्रन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दिसतात. केरळमध्ये कधी बसस्टॉपवर तर कधी रेल्वे स्टेशनवर ते रेल्वेची वाट पाहात उभे असतील तर त्यांना सेल्फीसाठी अनेकांकडून विचारणा होते. तेही अतिशय नम्रपणे लोकांची ही हौस पूर्ण करतात.

मोदींची खिल्ली उडवणारे ट्विट पडले महागात, ‘एआयबी’विरोधात गुन्हा दाखल

मात्र ६१ वर्षांचे असलेले हे गृहस्थ आपण मोदींसारखे दिसत असल्याच्या गोष्टीला काहीसे वैतागले आहेत. मुंबईतील ऑल इंडिया बकचोद या कॉमेडी ग्रुपने त्यांच्या फोटोचे मॉर्फिंग करुन त्याला कुत्र्याचे कान आणि नाक लावल्यावरुन वाद निर्माण झाला होता. या व्यक्तीची दाढी, चेहरा, शरीराची ठेवण ही तंतोतंत मोदींसारखीच आहे. मात्र अशाप्रकारे सारखे दिसत असल्याचा आपल्याला त्रास होत असून मी पुढच्या आठवड्यात दाढी काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोक माझ्या चेहऱ्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

Tanmay Bhat meme controversy: शशी थरूर यांनी वापरला ‘डॉग फिल्टर’; तन्मय भटच्या अटकेचा निषेध

बंगळुरुमध्ये आपल्या मुलाकडून केरळला परतत असताना हे गृहस्थ रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहत होते. यावेळी कोणीतरी त्यांचा फोटो काढला आणि त्याचे मिम बनवले. काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाला. मोदींची अशाप्रकारे थट्टा केल्यावरुन मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने शुक्रवारी ‘एआयबी’विरोधात गुन्हा दाखल केला होता. ‘एआयबी’ने दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणारे एक ट्विट केले होते. यात मोदी एका स्थानकावर थांबले असून ते मोबाईलमध्ये स्नॅपचॅटमधील डॉग फिल्टरचा वापर करत असल्याचे या छायाचित्रात दाखवण्यात आले होते. हे मीम अवघ्या काही तासांमध्येच व्हायरल झाले होते. मात्र यातून मोदींचा अपमान झाल्याची टीका सुरु झाली होती. शेवटी ‘एआयबी’ने हे ट्विट डिलीटही केले होते. मात्र काही नेटिझन्स हा प्रकार मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. मुंबई पोलिसांनीही यावर उत्तर दिले होते. ‘हा प्रकार लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहोत. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवण्यात आले आहे,’ असे मुंबई पोलिसांनी म्हटले.