Viral video: सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. केरळमधून एक हृदयद्रावक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दीड वर्षांचा नातू खेळत असताना आजोबांच्या कारखाली चिरडला गेला. अंगावर काटा आणणारी ही घटना आणि घटनेचा व्हिडीओही खळबळ माजवत आहे.

लहान मुलांवर खेळताना फार लक्ष ठेवणं आवश्यक आहे. बऱ्याचदा खेळतानाच मुलं जखमी होण्याची शक्यता जास्त असते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ही घटना केरळमधील कासारगोज जिल्ह्यातील असून हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. त्याचं झालं असं की घराच्या बाहेर एक दीड वर्षाचा मुलगा आणि आणखी एक मुलगा खेळत होते. यावेळी आजोबा त्यांच्या घरासमोर कार पार्क करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचवेळी चिमुकला गाडी पाहून गाडीच्या जवळ गेला. मात्र, दुर्दैवानं आजोबांना नातू खेळताना दिसला नाही आणि त्यांनी गाडी मुलाच्या अंगावर चालवली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अक्षरश: गाडीचं पुढचं चाक चिमुकल्याच्या अंगावरुन पुढे गेलं. यानंतर तात्काळ चिमुकल्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथे डॉक्टरही त्याला वाचवू शकले नाहीत.

पाहा हृदयद्रावक व्हिडीओ

हेही वाचा >> परिस्थिती भाग पाडते नाहीतर…सफाई कर्मचाऱ्याचा डान्स VIDEO पाहून म्हणाल…ह्याला म्हणतात अस्सल टॅलेंट!

संबंधित घटना १० नोव्हेंबरची आहे. मस्तूल जिशान असं या दीड वर्षाच्या मुलाचं नाव होतं. ही संपूर्ण घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @HateDetectorsया पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.