Shocking Viral video: लहान मुलं खूप निरागस आणि धाडसी असतात. त्यांना लहानपणी कसलीही भीती वाटत नसते. खरं तर आजकालची पोरं खूप जास्त खोडकर आणि बदमाश असतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. लहान मुलांकडे डोळ्यात अंजन घालून लक्ष द्यावं लागतं, अन्यथा नजर हटी आणि दुर्घटना घटी अशी गत होते. मुलांच्या प्रत्येक कृत्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. तर कधी कधी पालकांचाही हलगर्जीपणा कारणीभूत ठरतो.
असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही सेकंदांसाठी तुमच्याही काळजात धस्स होईल. एक महिला आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन उभी होती. तेवढ्यात एक तरुण आला अन् त्यानं या महिलेला उचलून घेतलं. पण या नादात ते बाळ महिलेच्या हातून सटकलं. अन् पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरात काहीतरी कार्यक्रम असल्याचं दिसत आहे. यावेळी सर्वच उत्साहात आहे.याठिकाणी एक तरुणी डान्सही करताना दिसत आहे. तर तिच्या मागे एक महिला आपल्या बाळाला घेऊन उभी होती. अन् तिच्या पाठीमागे काही मंडळी भल्यामोठ्या भांड्यांमध्ये जेवण बनवत आहेत. तेवढ्यात एक तरुण येतो आणि पाठीमागे उभी राहून डान्स पाहात असलेल्या त्या महिलेला उचलून घेतो. पण या नादात तिच्या हातामधील ते बाळ सटकतं आणि खाली पडतं. आश्चर्याची बाब म्हणजे ही महिला उकळतं तेल असलेल्या कढईच्या शेजारी उभी होती. पण सुदैवानं ते बाळ कढईच्या शेजारी पडतं. त्यामुळे त्याचे प्राण वाचतात.यावेळी तिथे बसलेला आचारीही त्या महिलेला पडण्यापासून वाचवताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे! घराच्या बाहेर पडताच तरुणीचे केस बर्फानं गोठले; VIDEO पाहून कळेल परिस्थिती
एकीकडे धकाधकीच्या जीवनात मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. अशातच अशा प्रकारच्या अनुचित घटनांना पालकांना सामोरे जावे लागत आहे.