Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे बघून लोक कधी हसतात तर कधी हैराण होतात. तर काही व्हिडीओ आपल्या कल्पनेच्या बाहेरचे असतात. जंगलात दोन प्राण्यांच्या लढाईचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील.प्राण्यांमध्ये गमती-जमती करणारा एक प्राणी म्हणजे माकड. माकडांचे कारनामे पाहून लोक नेहमीच अवाक् होतात. असाच एक हैराण करणारा व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मुंगूस आणि सापाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आता माकड आणि किंग कोब्राचा एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
माकड अतिशय खोडकर असतं. त्याच्यासमोर जो येईल त्याला तो त्रास देतो. पण एका माकडा ने चक्क खतरनाक किंग कोब्रा सापा शीच पंगा घेतला आहे. किंग कोब्रा जगातील सर्वात खतरनाक आणि विषारी सापांपैकी एक. ज्याचा दंश होताच काही तासांतच जीव जातो. अशा किंग कोब्राच्या वाकड्यात माकड शिरलं. माकडाने किंग कोब्राला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याने किंग कोब्राशी शेपटी खेचली. वारंवार तो शेपटी खेचत राहिला.
व्हिडीओत पाहू शकता किंग कोब्रा फणा काढून बसलेला दिसतो आहे. त्याच्या समोर एक माकड आहे. माकड सापाच्या जवळ येतं आणि त्याची शेपटी खेचतं. साप सुरुवातीला पाहतच राहतो. त्यामुळे माकडाची हिंमत आणखी वाढते. तो पुन्हा सापाची शेपटी खेचतो आणि त्याला थेट आपल्या खांद्यावर ठेवतो.सापाची मान पकडून वर उचलल्यानंतर, माकडाने सापाला त्याच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी माकडाने कोणतीही भीती न बाळगता सापाला त्याच्या गळ्यात घातले. विशेष म्हणजे, माकड सापाच्या मानेला स्पर्श करत आहे पण यावेळी किंग कोब्रा अजिबात हल्ला करत नाही किंवा माकडावर हल्लाही केला नाही. पुढे माकडही किंग कोब्रासमोर नतमस्तक होताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर sachin_.244 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “आज माकडाचा चांगला दिवस होतो म्हणून बचावला” तर आणखी एकानं, “बापरे किंग कोब्रा एवढा संयमी पहिल्यांदाच पाहिलं आहे.”