King Cobra Attack Shocking Video : सापाचं नाव ऐकलं तरी काळजात धडकी भरते, त्यामुळे माणूसचं नाही तर प्राणीदेखील सापापासून अंतर ठेवून राहतात. कारण किंग कोब्रासारखे काही विषारी साप इतके घातक असतात की त्यांच्या एका दंशात काही मिनिटांत माणूस आणि प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो. पण, काही जण सापाला खेळणं असल्याप्रमाणे हाताळताना दिसतात आणि स्वत:हून मृत्यूला कवटाळतात. सध्या सोशल मीडियावर सापाचा असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्या काळजाचं पाणी पाणी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण यात एका व्यक्तीला सापाबरोबर खेळणं जीवावर बेतलं आहे.
ज्या सापाला पाहून लोक दूर पळतात, त्या सापाच्या अगदी जवळ बसून एक व्यक्ती त्याला पटापट चापट लगावतोय. यानंतर नाचत सापाचा फणा पकडून त्याला गळ्यात टाकतो, हेच खेळ करत असताना साप व्यक्तीच्या बोटाला चावतो. यानंतर पुढे जे काही घडतं ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सध्या या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय.
व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती किंग कोब्रा सापाला हातात घेऊन आरामात खेळवतोय, वारंवार तो सापाला चापट मारत डिवचण्याचा प्रयत्न करतोय, कधी त्याचा फणा पकडून नागीण डान्सवर नाचतोय. कधी सापाला उचलून तो गळ्यात टाकतो आणि त्याचा फणा हवेत जोरात हलवू लागतो. याचवेळी साप अचानक त्याला बोटाला चावतो, ज्यामुळे काहीवेळाने ती व्यक्ती बेशुद्ध पडते.
असे सांगितले जाते की, या घटनेनंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारांआधीच त्याचा मृत्यू झाला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तो पाहून लोकही हैराण झालेत. @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात लोकांना सापाबरोबर खेळू नका असे आवाहन करण्यात आले आहे.