Viral video: सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यत सगळेच अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्धीस येईल आणि कोणाची चर्चा होईल सांगता येत नाही. एका व्हिडीओमुळे अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात आलेत. असाच एका आजीचा व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.कोकणात दरवर्षी गणेशोत्सवात एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय. कोकणातील अनेक वाडी-वस्त्यांमध्ये गणरायाच्या आगमनानंतर नमन, भजन, फुगडी, जाखडी नृत्य आणि शक्ती-तुरा यांसारख्या सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भजन, फुगड्या, आरत्यांचे सूर ऐकायला मिळतात. यावेळी गौराईच्या आगमनानंतर महिला, तरुणी एकत्र येत पारंपरिक गाणी म्हणत फुगड्या खेळण्याचा आनंद घेताना दिसतात. अशाच प्रकारे कोकणातील ७५ वर्षीय आजींच्या जुगलबंदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
कोकणात पिढ्यानपिढ्या चालत आलेली गाणी, पारंपरिक लोककला, नृत्य अजूनही तितकंच जपलं गेलंय. याचं भक्कम उदाहरण म्हणजे या व्हायरल झालेल्या आजी. सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईंचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत वयोवृद्ध आजी गणपती बाप्पासमोर फुगडी घालताना दिसतायत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजी या पारंपारिक नृत्य सादर करत आहे. या दोघींनी बसफुगडीचा आनंद लुटला आहे. एवढच नाहीतर या दोघींमध्ये फुगडी खेळण्याची जुगलबंदी लागली आहे. अत्यंत उत्साहीने त्या फुगड्या खेळताना दिसत आहे. या दोघींच्या वयाचा विचार केला असता या ७० च्यावर असतील. मात्र याही वयातील यांच्या उत्साहाला तोड नाही. नऊवारीत आजींनी फुगडी खेळण्याचा ठेका धरला आहे.ज्यामध्ये दोन महिला फुगड्या खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यातून कोकणातील महिला पारंपरिक पद्धतीने फुगडी खेळण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही नव्या पिढीच्या काळात जोपासत असल्याचे दिसून येत आहे.
पाहा व्हिडीओ
कोकणातील सांस्कृतिक कलांचे उत्तम उदाहरण दाखवणारा हा व्हिडीओ maza_gaav_lahulase या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये कोकणातील पारंपारिक बस फुगडी. वयाची ७५ री पार… पण उत्साह तरुणींनाही लाजवेल . आमच्या निरामामी आणि बायआत्या यांची जुगलबंदी असे लिहिले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या भन्नाट कमेंट्सदेखील केल्या आहेत. एकाने लिहिलेय की, लोककला, संस्कृती व परंपरा यांचं उत्तम उदाहरण… तर दुसऱ्या एकाने लिहिलेय की, “ही शेवटची पिढी”