Ankita Walawalkar : कोकण हार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कोकण सन्मान २०२४ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तिने केलं होतं. तसंच राज ठाकरेंच्या सभेचा एक मेसेज तिने इंस्टाग्रामवर दिला होता. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा झाली होती. आता हीच अंकिता वालावलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कारण तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिचा स्टँड अप कॉमेडीचा हा प्रयत्न फसला असं म्हणत नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत.
अंकिता स्टँड अप कॉमेडी व्हिडीओत काय म्हणते?
“काही कलाकारांना व्हायरल होण्यासाठी श्रद्धा कपूरच्या बाजूला बसून पादावं लागतं. माहित असेलच तुम्हाला.. माहिती आहे का कुणाला? नाही माहिती अरे सर्च करा फेमस आहे तो व्हिडीओ. व्हायरलही झाला. युट्यूबवर सर्च करा. मी रिसर्च करताना सर्च केलं… माझ्या बहिणीला तो व्हिडीओ दाखवला तिला विचारलं सांग बरं खरंच तो पादलाय का? ती म्हणाला नाही तो सोफ्याचा आवाज वाटतोय. मग दुसऱ्या बहिणीला विचारलं ती मला म्हणाली तू एक काम कर श्रद्धा कपूरला जाऊन विचार वास आला होता का? ” तिने हा जोक सांगितला त्यावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे.
नेटकऱ्यांनी उडवली अंकिताची खिल्ली
अंकिता वालावलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काल मी नैराश्यातून बाहेर आलो..आज हिचा विनोद ऐकून परत नैराश्यात जातोय, ज्या गोष्टी जमत नाही..त्या माणसाने करूच नये, बाई तू आंबेच विक, बाई तुला हे नाही जमणार, दुसऱ्यांच्या पादण्यावर रिसर्च करणारी ही बहुतेक पहिलीच असावी, माईक फेकून मारावा, अशी तुझी कॉमेडी, मी आधी व्हिडीओ पाहिल्या, मग कमेंट्स वाचल्या त्यानंतर मला हसू आलं. अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

अंकिताने प्लॅनेट मराठी ओटीटीसाठी पहिला स्टँडअप कॉमेडी शो केला आहे. ‘उभ्या उभ्या’… अ मराठी सेलिब्रिटी स्टँड-अप शो’ असं या विनोदी कार्यक्रमाचं नाव आहे. त्यातल्या या जोकवरुन मात्र तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.