Viral video: सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे पावसाळ्यात निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात नको तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात. पण, असे साहस काही वेळा चांगलेच जीवावर बेतते. अशा घटना पाहता वारंवार सांगितले जाते की, पाण्याशी कधी खेळू नका. तरीही काही लोक जीवाची पर्वा न करता, धाडस करताना दिसतात. कधी कधी विचार न करता घाई-घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायला भाग पाडतो. काही व्यक्तींमध्ये जरा जास्तच उत्साह असतो. याच उत्साहाला उधाण आलं की उत्साह कधी अनाठायी धाडसामध्ये बदलून जातो ते कळतही नाही.

कधी कधी काही धाडसी प्रयोग यशस्वी होतात. पण हेच प्रयोग अंगलट येऊन अगदी जीव जाईपर्यंतची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजुबाजुला बघतच असतो. दररोज जे काही अपघात होतात त्यातले २० टक्के अपघात तरी विनाकरण काहीतरी अतिधाडस केल्याने हतात. आता हेच बघा ना कोल्हापुरात या आजोबांना पुराच्या पाण्यातून पूल ओलांडणं महागात पडलं. हे आजोबा पुराच्या पाण्यात डोळ्यादेखत वाहून गेले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नदीला पूर आला असून याचे पाणी एका पुलावरुन वाहत आहे. यावेळी पाण्याचा वेग प्रचंड असून दोन्ही बाजूनं संपर्क तुटला आहे. हा पूल ओलंडण्याचं धाडस म्हणजे, जिवाशी खेळ होऊ शकतो. अशातच हेच धाडस एका आजोबांनी केलं आणि बघता बघता ते या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. दोन्ही बाजूनं लोक या आजोबांना थांबवत आहेत मात्र या आजोबांनी कुणाचंही न ऐकता पूल ओलांडण्याचं धाडसं केलं आणि ते वाहून गेले. सुरुवातीला दिसणारे हे आजोबा काही क्षणातच पाण्याच्या प्रवाहात दिसेनासे झाले.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ journalist.ajay_25 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.