सोशल मीडियामुळे अनेक जण घरबसल्या पैसे कमवतात. यूट्यूबवर ब्लॉग बनवणे, व्हिडीओ बनवून पोस्ट करणे आदी गोष्टी अनेक तरुण मंडळी करताना दिसतात आणि प्रसिद्ध होतात. पण, या गोष्टी करताना ते कधी कधी स्वतःचे भान विसरतात आणि धार्मिक स्थळांवर जाऊन व्हिडीओ शूट करतात आणि इतरांच्या भावना दुखवतात. तर सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. या दरम्यान एक पोस्ट व्हायरल होत आहे. कोलकाताच्या एका मंडळाने एक अनोखा निर्णय घेतला आहे.

देवीच्या मंडपात जाऊन अनेक जण रील तर काही जण कन्टेन्ट व्हिडीओ शूट करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करून प्रसिद्धी मिळवतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवून कोलकाताच्या एका प्रसिद्ध मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पूर्वाचल शक्ती संघ (Purbachal Shakti Sangha) या प्रसिद्ध मंडळाने देवीच्या मंडपात यूट्यूबर्सना येण्यास नकार दिला आहे. देवीच्या मंडपाबाहेर हा खास बोर्ड तयार करून लावण्यात आला आहे आणि खाली मंडळाचे नाव लिहिलं आहे. देवीच्या मंडपाबाहेर लावलेली सूचना एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा..

हेही वाचा…काळ बदलतोय भाऊ! दांडिया नाही; तर महिला चक्क तलवारीने खेळतायत गरबा; पाहा Video….

पोस्ट नक्की बघा :

देवीच्या मंडपात यूट्यूबर्सना परवानगी नाही :

सोशल मीडियावर एका युजरने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. फोटोवर काही मजकूर लिहिण्यात आले आहेत. एका पांढऱ्या कागदावर “यूट्यूबर्सना परवानगी नाही”, असे लिहून मंडपाच्या बाहेर लावण्यात आले आहे. देवीच्या मंडपात यूट्यूबर्सना परवानगी नाही अशी स्पष्ट सूचना देवीच्या मंडपाबाहेर लावण्यात आली आहे आणि खाली मंडळाचे नाव नमूद करण्यात आले आहे. सध्या ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. इन्फ्लुएन्सर, ब्लॉगर, कन्टेन्ट क्रिएटर जिथे जागा मिळेल तिथे व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात करतात म्हणून या मंडळाने हा खास निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट @swatiatrest या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच कोलकाताच्या मंडळाचे कौतुक कॅप्शनमध्ये करण्यात आले आहे. पोस्ट पाहून अनेक जण या निर्णयाचे कौतुक करत आहेत आणि ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.