भारत आणि चीन सीमेवर १५ जून रोजी झालेल्या हिंसेमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे. देशातील अनेक ठिकाणी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत अगदी सोशल मिडियापासून ते रस्त्यांवर उतरुनही आंदोलन केलं जात आहे. चीन विरोधातील राग व्यक्त करण्यासाठी चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे फोटो, मेड इन चायना वस्तू जाळण्यात येत आहेत. असं असतानाच अता पश्चिम बंगालमधील अशाच एका चिनी मालावर बहिष्कार घालण्यासंदर्भात केलेल्या आंदोलनामध्ये चक्क अमेरिकेचा नकाशा वापरण्यात आल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपा कार्यकर्त्यांनी चीनला विरोध करताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याऐवजी उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांचा पुतळा जाळला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता कोलकात्यामधील एका आंदोलनामध्ये चिनी कंपन्यांना विरोध करताना आंदोलकांना बॅनवर चक्क अमेरिकेचा नकाशा लावल्याचे दिसून आलं आहे. सध्या या आंदोलनातील या बॅनरचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. अमेरिकेच्या नकाशावर चीनचा राष्ट्रध्वज लावल्याचे या बॅनरमध्ये दिसत आहे.

सीपीएम (आय) च्या विद्यार्थी परिषदेचा नेते मुकेश बिस्वास यांनी हे आंदोलक भाजपाचे असल्याचे ट्विटवर म्हटलं आहे.

सीपीएमचे खासदार एमडी सालीम यांनाही अशाच प्रकारचे ट्विट केलं आहे.

या फोटोमध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा दिसत नसल्याने हे आंदोलक नक्की कोणत्या पक्षाचे होते हे फोटोमधून स्पष्ट होत नाहीय. मात्र हा फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरला असून अनेकांनी या फोटोवर मजेदार ट्विट केले आहेत.


चांगल्या शिक्षणाची गरज

२)
चीनने अमेरिकाही ताब्यात घेतला

३)
पुन्हा एकदा

४)
यात नवं काहीच नाही

५)
खरे देशभक्त

६)
चीनबद्दल किती ठाऊक आहे दिसतयं

७)
नेत्याचा फोटो तरी बरोबर लावलाय नाहीतर

हा फोटो अनेक अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून या फोटोवर आंदोलन करणारेच ट्रोल होताना दिसत आहे.