कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टेरर काला चश्मा हे गाणे सध्या पार्ट्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. न नाचणारे देखील या गाण्यावर किमान पाय तरी हालवतील इतकी या गाण्याची ताकत आहे. लोक त्यावर डान्स रिल्स बनवत आहेत. देशातच नव्हेत तर या गाण्याने विदेशातील नागरिकांना देखील भुरळ घातली आहे. या गाण्यावर एक कोरीयन डान्स ग्रुपने भन्नाट डान्स केला आहे. हा उत्साहात या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे.

इन्स्टाग्रामवर ruhatenizo नावाच्या अकाउंटवर डान्सचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये काही कोरीयन व्यक्ती काला चश्मा या गाण्यावर उत्कृष्ठ नृत्य करताना दिसून येत आहे. या व्यक्तींनी पारंपरीक कपडे घातलेले आहे. गाण्यावर त्यांनी काला चश्माचा सिग्नेचर मुव्ह केला आहे.

(Viral : विद्यार्थ्याने दाखवले माणूसकीचे दर्शन, भूकंपात जखमी मित्राच्या मदतीला धावला, पाहा व्हिडिओ..)

विदेशातही बॉलिवूड गाण्याचे चाहते

कोरीयन मुलांनी मोठ्या जोशात डान्स स्टेप्स करत आहेत. या व्हिडिओवर काही तासातच कमेंट्सचा आणि व्ह्यूजचा पाऊस पडला आहे. लोकांनी हा व्हिडिओ जाम आवडला आहे. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही बॉलिवूड गाण्याचे चाहते आहेत असे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.

नेटिझन्सने केले कौतुक

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. डान्ससाठी हे गाणे निवडल्याबद्दल एक युजरने या तरुणांचे कौतुक केले आहे. एक युजरने हे काला चश्माचे बेस्ट वर्जन असल्याचे म्हटले, तसेच डान्स करणाऱ्या तरुणांना शुभेच्छा देखील दिल्या, तर एका युजरला यावर विश्वासच बसत नाहीये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Viral : गाढवाशी बोलू पाहतोय व्यक्ती, सुरुवातीला केवळ मान हालवली, नंतर दिली जोरदार प्रतिक्रिया, पाहा मजेदार व्हिडिओ)