Marathi Lavani Viral Video : एकीकडे महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्यावरून वाद सुरु आहे तर दुसरीकडे मराठी भाषा अन् महाराष्ट्राच्या संस्कृतीला जागतिक पातळीवर लोकप्रियता मिळत आहे. महाराष्ट्रात त्रिभाषा सुत्रावरून आधीच वातावरण तापलंले आहे, दरम्यान महाराष्ट्रात राहणाऱ्या हिंदी भाषिक मराठी बोलण्यास नकार देताना दिसत आहे. मराठी हिंदी भाषेच्या वादाच्या पाश्वभूमीदरम्यान, काही दिवसांपूर्वी वाजले की बारा ही मराठी लावणी गाणाऱ्या इटालियन महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता ज्यामुळे जागतिक पातळीवर मराठी भाषेला मिळणारे प्रेम दिसून आले. आता मराठी संस्कृतीची झलक दाखवणारा कोरियामधील एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये कोरियन तरुणी चक्क महाराष्ट्राची शान असलेले लावणी नृत्य सादर करताना दिसत आहे.
लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी ही वाटते तितके सोपे नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते. ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. असाच एक सुंदर लावणीचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे ही लावणी कोरियन तरुणींनी सादर केली आहे हे दर्शवते की विदेशातील तरुणींना लावणी आणि महाराष्ट्राची लोककला आवडते.
“बाई मी पतंग उडवित होते” वर ठसकेबाज लावणी (Energetic Lavani on “Bai Mi Patang Udivit Hote”)
noori.bak’s आणि aditibhagwat1 नावाच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. अदिती भागवत या प्रसिद्ध नृत्यांगणा आणि अभिनेत्री आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”पतंग उडवण्याचा हंगाम नाही, पण मग सोलमध्ये का उडवू नये! #सोल, #दक्षिणकोरिया येथील ग्योंगहुइगुंग पॅलेसमध्ये माझ्या कोरियन बहिणींबरोबर पतंग उडवित होते गाण्यावर @noori.bak @danha0313 @xixingirl यांनी पारंपारिक नऊवारी साड्या परिधान करून कोरियाबरोबर महाराष्ट्राची संस्कृतीचा गौरव वाढवणाऱ्या या तीन सुंदरी आपल्याला मंत्रमुग्ध करतात.”
कोरियन तरुणींच्या लावणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Video Goes Viral on Social Media)
कोरियन मुलींचा मराठमोळा लुक (Korean Girls in Traditional Marathi Look)
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कोरियातील सोल येथील एका ऐतिहासिक इमारतीसमोर नऊवारी परिधान केलेल्या तीन तरुणी नृत्य करताना दिसत आहे. तरुणींनी लावणी नृत्यांगणेप्रमाणेच केसात गजरा माळला आहे, पायात घुंगरू घातले आहेत आणि नऊवारी साडी नेसली आहे. पारंपारिक महाराष्ट्रीय दागिणे, कानात झुमके, नाकात नथ, हातात बांगड्या परिधान केल्या आहेत. पारंपारिक मराठी वेषभुषेत तीनी तरुणी अत्यंत सुंदर दिसत आहे. एवढंच नाही त्यांनी लावणी नृत्य देखील अत्यंत अचुकपणे सादर केले आहे. कोरियन मुलींची ठसकेबाज लावणीने महाराष्ट्रीयांचे मन जिंकले आहे.
मराठी संस्कृतीचा जागतिक ठसा (Global Appeal of Marathi Culture)
व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. एकाने कमेंट केली की, “खूपच सुंदर, उत्कृष्ट, खूप आनंद झाला बघून. कोरिओग्राफी खूप सुंदर केली आहे अदिती ताई.”
दुसऱ्याने कमेंट केली की, “हीच खरी मराठी संस्कृती”
तिसऱ्याने कमेंट केली की, आपली ही खरी लावणी परदेशी कलाकार शिकत आहेत याचा अभिमान वाटतो अभिमानास्पद आदिती ताई.
कोण आहे अदिती भागवत? (Who is Aditi Bhagwat?)
अदिती भागवतही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध कथक आणि लावणी तज्ज्ञ, अभिनेत्री, नृत्य शिक्षक आणि कोरियोग्राफर आहे. तिने मुंबईत तरुण आणि महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना कथक नृत्य शिकण्यासाठी अदिती नृत्य अकादमी सुरू केली. ती जगभरात प्रवास करते आणि स्टेज शोमध्ये सहभागी होऊन इतर भारतीय संगीत कलांचे सहकार्य करते.