Krishna Janmashtami 2025 Horoscope : हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी या तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते. तर यावर्षी जन्माष्टमीला ग्रहांचा अतिशय शुभ संयोग निर्माण होत आहे.
शनी वक्री आहे. तसेच बुद्ध आणि सूर्य दोघेही कर्क राशीत आहेत. १६ आणि १७ तारखेच्या रात्री सूर्य स्वतःच्या राशीत येईल. जिथे त्यांची केतूबरोबर युती होईल. सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. सूर्य आत्मविश्वास, नेतृत्व आणि उर्जेचा कारक मानला जातो. तर शनि मीन राशीत असेल आणि देवांचा गुरु बृहस्पति आणि शुक्र मिथुन राशीत असणार आहेत. तर राहू राहू कुंभ आणि केतु सिंह राशीत असणार आहेत. तर मंगळ कन्या राशीत आहे. अशा प्रकारे, ग्रहांची स्थिती असल्यामुळे अनेक राशींना लाभ होण्याची शक्यता आहे.
इतकेच नाही तर यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीला अमृतसिद्ध योग आणि सर्वार्थसिद्ध योग तयार होत आहेत. याशिवाय, भरणी, कृतिका आणि रोहिणी नक्षत्राचेही संयोजन होईल . अशा परिस्थितीत कोणत्या राशींना लाभ होण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊया…
वृषभ (Taurus)
जन्माष्टमीला होणाऱ्या योगायोगांचा फायदा वृषभ राशीच्या लोकांना होणार आहे. या दिवशी शुभ योगांमुळे तुमचे रखडलेले किंवा बिघडलेले काम पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ आणि नोकरी, परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo)
जन्माष्टमीला सिंह राशीच्या लोकांना पुढे जाण्याच्या संधी मिळतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी, रवि, बुध आणि केतुमुळे, तुमच्या राशीच्या लोकांना लाभ होईल. या काळात तुम्हाला दोन गोष्टी मिळतील: पहिले ऑफिसमध्ये पदोन्नती आणि दुसरे म्हणजे व्यवसायात नफा मिळेल. प्रेम जीवनात चांगले बदल होण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांना गुरु आणि शुक्रचा फायदा होईल. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत यश मिळेल. चांगली भागीदारी आणि व्यवसायात नफा होण्याची शक्यता दिसते आहे.
तर अशाप्रकारे वृषभ, सिंह आणि मिथुन राशीसाठी जन्माष्टमी खास असणार आहे…