KTM 160 Duke: भारतातील स्पोर्ट्स बाईक प्रेमींमध्ये केटीएम हे एक अतिशय लोकप्रिय नाव आहे. केटीएमने गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ही बाइक तरुणांना इतकी आवडली होती की कुणीही ही बाइक घेण्यासाठी धडपड करत होता. पण बघता बघता या बाइकवर छपरी असा स्टॅम्प बसला आणि KTM बाइकला उतरती कळा लागली. दिवाळखोरीमुळे ही कंपनी काही काळ चर्चेत राहिली असली तरी आता ती पुन्हा बाजारात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता KTM नवीन बाईकसह भारतात दमदार पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.

कंपनी लवकरच आपली नवीन KTM १६० Duke ही बाईक लॉन्च करणार आहे. बाईकचा पहिला टीझर नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. कंपनी एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये शक्तिशाली मॉडेल आणण्याची तयारी करत आहे. असे मानले जाते की, ही बाईक 125Duke ची जागा घेईल.

टीझरमध्ये बाईकची संपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही, मात्र ऑटो तज्ञांच्या मते, ही नवीन बाईक KTM 200 Duke च्या प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. म्हणजेच, या बाईकला सेकंड जनरेशन डिझाइनसारखेच उत्तम डिझाइन मिळेल. या नवीन बाईकमध्ये ट्रेलिस फ्रेम, ४३ मिमी यूएसडी फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनोशॉक सस्पेंशन देखील पाहता येईल.

नवीन केटीएम १६० ड्यूकमध्ये पूर्णपणे नवीन १६० सीसी इंजिन दिले जाईल, जे सध्याच्या २०० ड्यूकच्या इंजिनपासून प्रेरित असेल. हे इंजिन सुमारे १९-२० बीएचपी पॉवर जनरेट करेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ही बाईक एंट्री-लेव्हल परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये एक मजबूत पर्याय बनेल. हे शक्तिशाली इंजिन दररोजच्या रायडिंगसाठी, तसेच हायवे क्रूझिंगसाठी उत्तम असेल. KTM ने या बाईकमध्ये त्यांचे सिग्नेचर थ्रोटी एक्झॉस्ट नोट कायम ठेवले, तर ही बाईक तरुण रायडर्सना आवडू शकते.बऱ्याच अहवालांनुसार, केटीएम ही नवीन बाईक याच ऑगस्ट महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे.दरम्यान, कंपनीने अद्याप या बाईकच्या किमतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Google trends photo