Agra Woman Files Divorce over Kurkure : लग्न हे फार पवित्र आणि भावनिक नाते मानले जाते. लग्न झाल्यानंतर काही दिवस फार आनंदात, सुखात जातात. मात्र त्यानंतर अनेकदा काही पती- पत्नीमध्ये वैचारिक मतभेद आणि एकमेकांच्या सवयी न आवडीच्या होतात. अशा परिस्थितीत हे नाते टिकवणे अवघड होऊन बसते. यात हल्ली अगदी शुल्लक कारणावरुनही पती पत्नी घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत जाऊ पोहोचतात. सध्या अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातून समोर आली आहे. यात फक्त ५ रुपयांच्या कुरकुऱ्याच्या पॅकेटसाठी पत्नीने पतीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे.

यावेळी संतापलेल्या पत्नीने सासरचे घर सोडून पोलीस स्टेशन गाठले आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली. समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधीत पत्नीला मसालेदार पदार्थ खाण्याची आवड होती, त्यामुळे रोज काहीतरी चटपटीत तिखट पदार्थ तिला खायला हवे असायचे. रोज ती तिच्या पतीला ५ रुपयांचे कुरकुरे आणायला सांगायची. पण तिचे हे रोजचे मसालेदार पदार्थ खाण्याच्या सवयीवरुन दोघांमध्ये वाद व्हायचे. तरी रोज तो तिला कुरकुरे खायला घेऊन यायचा. मात्र एकदिवस कामावरुन येताना तो कुरकुऱ्याचे पॅकेट घेऊन आला नाही, ज्यावरुन दोघांचे जोरदार भांडण झाले, हे प्रकरण नंतर हाणीमारीपर्यंत जाऊन पोहोचले. शेवटी संतापलेली पत्नी पतीचे घर सोडून माहेरी गेली, यानंतर पोलिसांकडे तक्रार केली, यानंतर पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवले. शनिवारी दोन्ही पक्षांना कुटुंब समुपदेशन केंद्रात बोलावण्यात आले.

या जोडप्याचे २०२३ मध्ये लग्न झालं होतं. सुरुवातीचे काही महिने दोघांच सुरळीत सुरु होते. मात्र त्यानंतर दोघांचे अनेक कारणांवरुन खटके उडू लागले. यात पत्नीची लग्नापूर्वीपासूनची कुरकुरे खाण्याची सवय लग्नानंतरही तशीच राहिल्याने पतीला चिंता वाटू लागली. रोज अशाप्रकारे ती बाहेरचं काहीतरी खायला आणा सांगायची, असे पतीने सांगितले.

लाजा सोडल्या! बसच्या मागच्या सीटवर कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की….; VIDEO झाला व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर पत्नीने सांगितले की, नवीन लग्न झाल्यानंतर सहा महिने पतीने खूप काळजी घेतली. पण त्यानंतर तो खूप वेगळाच वागू लागला. त्याचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला, तो अनेक गोष्टी ऐकायचा नाही, छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडण करायचा, यात दोन महिन्यांपूर्वी ५ रुपयांचे कुरकुरे आणण्यास सांगितले पण ते आणले नाही, यानंतर तो माझ्याशी भांडण करत मला मारहाण केली, असा दावा महिलेने केला आहे. याप्रकरणी आता कौटुंबिक समुपदेशन केंद्राने दोघांना पुढील तारीख दिली आहे.

अशाप्रकारे काही महिन्यांपूर्वी पत्नीने आवडती साडी नेसली नाही म्हणून एका पतीने घटस्फोटाची मागणी केली होती. ही घटना देखील आग्र्यामध्येच घडली होती. पत्नीने पतीच्या आवडती साडी नेसण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद व्हायचे, अखेर दोघांमधील हा वाद घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचला.