Vada Pav Seller Viral Video: राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ सुरू झाली आणि हजारो महिलांच्या खात्यावर महिन्याला १५०० रुपये जमा होऊ लागले. पण सरकारवर खर्चाचा भार वाढतोय, अशी चर्चा एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे एका हुशार मराठी तरुणाने या योजनेचा जाहिरात म्हणून वापर करून ट्रेनमध्ये भन्नाट स्टाईलने वडापाव विकण्यास सुरुवात केली आहे. होय, एका तरुण विक्रेत्याने चक्क वडापाव विकण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ या लोकप्रिय शब्दांचा वापर करण्याची शक्कल लढवली आहे. वडापावच्या विक्रीसाठी त्याने लढवलेल्या हिकमतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सरकारने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. आता या योजनेच्या नावाच्या लोकप्रियतेचा वापर एका तरुणाने आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी असा काही भन्नाट पद्धतीने केला आहे, की संपूर्ण सोशल मीडियावर तो व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ट्रेनमध्ये वडापाव विकणाऱ्या या तरुणाची शक्कल पाहून लोक चकित झाले आहेत आणि त्याबाबत “हेच असतं अस्सल देसी मार्केटिंग!”, अशा आशयाची एकच चर्चा सुरू आहे.
तो मोठ्याने ओरडतो, “आले रे आले १५०० रुपये आले, पुढचा हप्ता २१०० रुपयांचा येणार! स्वतःचे पैसे खर्च करा आणि वडापाव घ्या!”, अशा घोषणा देत, हा विक्रेता ट्रेनमध्ये पूर्ण जोशात वडापाव विकतोय आणि प्रवासीही त्याच्या विनोदी शैलीतील बोलण्याला खदखदून हसत दाद देताना दिसतात. विक्रेत्याने या लोकप्रिय योजनेच्या नावाचा वडापावच्या विक्रीसाठी फार चांगल्या रीतीने वापर करून घेतलाय. जणू ते शब्द त्याच्या सेल्स टॅगलाइनचे साधन झाले आहेत. त्याच्या त्या विक्री कौशल्यामुळे प्रवाशांचे चेहरे खुलत आहेत आणि त्या तरुणाच्या हुशारीला सलाम करत लोक आपापल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ टिपतायत.
हा व्हिडीओ bola_rokhthok या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्याला आतापर्यंत १४ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. नेटिझन्सनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. कोणी म्हणतंय, “हा माणूस जाहिरात कंपनी चालवू शकतो”, तर कोणी म्हणतंय, “सरकारने याला प्रचारदूत बनवावं!”, तर कोणी लिहितयं, “काय भन्नाट आयडिया आहे, खवय्येपण खुश आणि विक्रेतापण!”..
येथे पाहा व्हिडीओ
पण… या तरुणाने योजनेचा उपयोग व्यवसायासाठी ज्या कौशल्याने केला ते पाहून सगळे थक्क झाले आहेत. पावसाळ्यात गरमागरम वडापाव आणि त्यावर सरकारच्या योजनेची मजेशीर हाळी. या VIDEO ने सोशल मीडियावर उडवलीय धम्माल. ट्रेनमधील ही देसी मार्केटिंगची स्टाईल पाहून नक्की वाटतं, “जिथे इच्छा, तिथे जुगाड!” हा व्हिडीओ पाहिला का? नाही पाहिला, तर एकदा नक्की पाहा आणि सांगाच, असा वडापाव तुम्ही घ्याल का?