Lalbaugcha raja 2025: मुंबई, महाराष्ट्रच नाही, तर देशात ‘लालबागच्या राजा’ची ख्याती आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक लालबागला येतात. ‘लालबागचा राजा’ हे मुंबईतील जुनं गणेशमंडळ आहे. दरवर्षी विक्रमी संख्येने भाविक दर्शनासाठी पोहोचत असतात. बाप्पाच भव्य रुप डोळ्यात साठवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.अनेक जण मनोकामना पूर्ण झाली म्हणून नवस फेडण्यासाठी तर अनेक मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून दर्शनासाठी येतात. या गणपतीच्या दर्शनाला पहिल्या दिवसापासून गर्दी असते. लालबागचा गणेशोत्सव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. देशभरातून अनेक भाविक लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. त्यामुळे लालबागमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. अशातच आता गणपती बाप्पा येण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहे. अशातच आता लालबाग नगरी सजली असून आता लालबागच्या राजाचा दरबारही सजला आहे. याचाच व्हिडीओही सध्या समोर आला असून यंदाच डेकोरेशन पाहून तुमचेही डोळे दीपून जातील.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यंदाचं डेकोरेशन फ्लोअर आहे. म्हणजेच पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या फुलांचं छान असं डेकोरेशन लालबागच्या राजाच्या दरबारात भक्तांना पाहायला मिळणार आहे.
लालबागच्या राजाची स्थापना १९३४ मध्ये करण्यात आली. त्या ठिकाणी असलेला बाजार कायम राहावा त्यासाठी त्या ठिकाणी असलेला कोळी व इतर व्यापाऱ्यांनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती झाली. त्यानंतर लालबागचा राजा गणपतीची कीर्ती सर्वत्र होऊ लागली. नवसाला पावणारा हा गणपती आहे, अशी प्रसिद्धी झाली. त्यावेळचे शामराव विष्णू बोधे, नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही.बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु.ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यानंतर १९३४ मध्ये ‘श्री’ची स्थापना झाली.
पाहा व्हिडीओ
मूर्तीसाठी अशी होते तयारी
लालबागच्या राजाची मूर्ती मुंबईत सर्वात उंच मूर्ती असते. शेकडो मूर्तीकार ही मूर्ती तयार करतात. मूर्तीकार गणरायाचे वेगवेगळे भाग तयार करतात. त्यानंतर ते जोडले जातात. मूर्ती जोडण्यापूर्वी एक विशेष पूजा केली जाते. गणपतीच्या पायाची ही पूजा असते. गणपती मंडळाचे सदस्य आणि मूर्तीकार या पूजेत सहभागी होतात. पूजा झाल्यावर मूर्तीला रंगकाम केले जाते. त्यानंतर सजावट केली जाते. राजाचे मांडव सजवण्याची जबाबदारी मोठ्या आर्ट डायरेक्टवर सोपवली जाते.