lalbaug cha raja 2025 Crowd: सलग दोन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने लालबागच्या राजाला मोठी गर्दी झालीय. गर्दी वाढल्याने मंडळ कार्यकर्त्याचा मुजोरपणाही अधिक वाढलाय. भाविकांना धक्काबुक्की असे प्रकार अजूनही सुरू आहेत. तर दुसरीकजे ज्यात व्हीआयपींना निवांत दर्शन घेऊ दिलं होतं. त्याचवेळी सर्वसामान्यांना मात्र अक्षरशः ढकललं जात असल्याचं आपण बघितलं होतं. अजूनही तीच परिस्थिती दिसून येत आहे.नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागचा राजाची ओळख आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागचा राजाला पाहायला भाविकांची प्रचंड गर्दी आहे. मुख दर्शनाची रांग असो किंवा चरण स्पर्श, भाविक तासनतास रांगेत उभे आहेत. यावेळी लालबागचा राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचाच भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. लालबाग राजाच्या चरणी दर्शनासाठी इतकी गर्दी वाढली आहे की लोकांमध्ये चेंगराचेंगरी होत आहे. अशातच काही महिला याच गर्दीत चेंगरल्या आणि तिथेच त्यांना चक्कर आली काहींचा श्वास गुदमरला तर एक महिला अक्षरश: चक्कर येऊन खाली पडली.

दरवर्षी लालबागच्या दर्शनासाठी लाखोंनी भाविक येतात, दोन दोन दिवस रांगेत उभे राहतात. अशातच गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतील लालबागचा राजा येथे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती दिसून आली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीचा आशिर्वाद घेण्यासाठी मोठा जमाव जमला होता, यावेळी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली. ज्यामध्ये गर्दी, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी दिसून येत आहे. यामध्ये महिला आणि लहान मुले देखील गर्दीत चिरडताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येतो. विशेष म्हणजे, यावेळी मुंबई पोलीस कुठेही दिसत नाहीत.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ पुन्हा एकदा लालबागचा राजा येथे सुव्यवस्था राखण्यात पोलिसांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अपयशावर प्रकाश टाकतो. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ होणारे उत्सवी वातावरण, सोशल मीडियावर टाकले जाणारे फोटो, रील्स यांना ‘लाइक्स’ मिळवण्याची हौस अधिक घातक ठरत असल्याचे घटनेमुळे समोर आले आहे.