lalbaug cha raja 2025 fight video: सध्या मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असून अनेक प्रसिद्ध गणपती मंडळांमध्ये व्हीआयपींची रीघ लागली आहे. लालबागचा राजाच्या चरणी तर अंबानी कुटुंबापासून अनेक दिग्गज मंडळी लीन झालीत. पण नुकतच या मंडपात सामान्य भाविक आणि VVIP ना वेगळी वागणूकअसा भेद-भाव पाहायला मिळाला आहे. रांगेत तासंतास तर कधी कधी दोन दोन दिवस रांगेत उभं राहिल्यानंतर भाविकांना दर्शनावेळी अक्षरश: ढकलून दिलं जातं. असाच काहीसा प्रकार घडला आणि भाविक कार्यकर्त्यांवर प्रचंड चिडले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची.

लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, यावर्षी एका बाजूला सर्वसामान्य भक्तांना धक्काबुक्की केली जात होती तर दुसऱ्या बाजूला उद्योगपती, सेलिब्रिटी लोकांना फोटो सेशनसह दर्शन दिले जात होते. लालबागचा राजाच्या मंडळाने यावर्षी VIP दर्शनाचा पॅटर्न राबल्याचं चित्र दिसून आलं होतं.

लालबागच्या राजाच्या दरबारात मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा सातत्याने दिसून येत आहे. सलग दोन दिवसांच्या सुट्टी असल्याने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झाल्याचा पाहायला मिळाली. गणेश भक्तांची गर्दी वाढल्याने मंडळाचे कार्यकर्त्यांच्या मुजोरपणाही अधिक वाढली. भाविकांना धक्काबुक्की,मानगुटीला धरून बाजूला फेकणे. भाविकांसोबत हाडामारी असे प्रकार अजूनही लालबागचा राजाच्या मंडळात सुरू आहेत. लालबागचा राजाचा मंडळात कार्यकर्त्यांकडून गणेश भक्तांच्या सोबत दिला जाणारा वागणुकीसंदर्भात काही व्हिडीओ देखील समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. सर्वसामान्यांना मात्र अक्षरशः ढकलला जात असल्याचा आपण बघितला आहे. अजूनही तीच परिस्थिती लालबागचा मंडळात दिसून येत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ maske_official77 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये घडलेला प्रकार सांगितला आहे. कॅप्शनमध्ये म्हंटलंय की, “लालबागचा राजा: खरंच गरीबांचा राजा राहिला का फक्त VVIP चाच? मुंबईतील लालबागचा राजा हा देशभरातील भाविकांसाठी आस्था आणि श्रद्धेचं केंद्र आहे. प्रत्येक वर्षी लाखो भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. “गरिबांचा राजा” ही ओळख असलेल्या या गणेशोत्सव मंडळाबद्दल आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

भाविकांचं म्हणणं आहे की, तिथले काही स्वयंसेवक अत्यंत उद्धट, अकार्यक्षम आणि अहंकारी वर्तन करतात. रांगेत उभ्या असलेल्या सामान्य भक्तांना कारणाविना धक्के दिले जातात, त्यांच्याशी अयोग्य भाषेत वागलं जातं.

दुसरीकडे, “VIP आणि VVIP” लोकांना सहज दर्शन मिळतं, तर तासन्तास रांगेत थांबलेल्या भक्तांना अपमानास्पद वागणूक सहन करावी लागते. त्यामुळे “हा खरंच गरिबांचा राजा आहे का, की फक्त श्रीमंत आणि सत्ताधाऱ्यांसाठीचा?” असा प्रश्न भक्तांच्या मनात निर्माण झाला आहे.

लालबागचा राजा हा सर्वांचा आहे. त्याच्या दर्शनात भेदभाव, उद्धटपणा किंवा फक्त VVIP साठी विशेष वागणूक देणं हे भक्तांच्या श्रद्धेला धक्का देणारं आहे. प्रशासनाने आणि मंडळाने तातडीने लक्ष देऊन भक्तांना योग्य तो सन्मान, सुविधा आणि सुरक्षितता दिली पाहिजे, हीच सर्वांची अपेक्षा आहे.”