Latur viral video: वाहतूक पोलिसांकडून अरेरावी होत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात काही नागरिक पोलिसांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करतात. तर काही व्हिडीओमध्ये पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी नागरिक पोलिसांशी वाद घालताना दिसत आहेत. दरम्यान सध्या लातूर शहरातील रेनापुर नाका परिसरात एका महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलने ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या तीन तरुणींना रस्त्यावर थांबवून मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
एकीकडे मुलींचा निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यावरून संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे महिला कॉन्स्टेबलने भररस्त्यात केलेली शिवीगाळ व मारहाणीबद्दलही टीका होत आहे. तीन तरुणी एकाच दुचाकीवर बसून भरधाव वेगाने जात असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर काही अंतर त्यांच्या पाठलाग करून त्यांना थांबवण्यात आल्या. त्याचवेळी महिला कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आणि रस्त्यावरच तिन्ही तरुणींना बदडलं, शिवीगाळही केल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
“जीव लई वर आला का?… रेस आहे का?… गाडी कशी चालवता, घरी सांगून आलात का?” अशा शब्दांत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिन्ही मुलींना रागाच्या भरात सुनावलं. मुली आपल्या चुकीची कबुली देत माफी मागताना दिसत आहेत, मात्र कॉन्स्टेबलचा राग अनावर झाला होता. व्हिडीओमध्ये कॉन्स्टेबल तरुणींना, “एकतर तिघी बसून चालल्यात, त्यात मागच्या दोघी वाकड्या बसल्या, रेस गाडी चालण्याचे लायसन्स मिळालं का? पायतन काढून हानीन तिघींना पण, मी लय घाण बोलेन हा पटकन बापाला फोन लावा…” अशा खालच्या स्तरावरील भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडीओ जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. तो सोशल मीडियावर शेअर केला, त्यानंतर तो वेगानं व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये तरुणी कॉन्स्टेबलची माफी मागताना दिसतेय, पण कॉन्स्टेबलचा राग काही शांत झाला नाही.
पाहा व्हिडीओ
ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे. वाहतूकीचे नियम न पाळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र काहीवेळा वाहतूकाचे नियम मोडणारेच पोलिसांसमोर आडीबाजी करतात. अशावेळी वाद होतात आणि त्याचे परिणाम चुकीचे होतात. दरम्यान आता पुन्हा एका वाहतूक पोलीस चर्चेचा विषय बनलेत