दिवाळीचा सण संपला. गेल्या पाच दिवसांपासून खूप फटाके फोडताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल. फटाक्यांशिवाय दिवाळी अपूर्णच आहे. दिवाळीत फटाके फोडण्याची मजा काही औरच आहे. पण फटाके फोडताना नेहमी काळजी घेण्याचं सांगितलं जातं.मात्र तरीही काही अतिशहाणे लोक फटाक्याबरोबर मस्ती करताना दिसतात. अशाच एका आजोबांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल. कारण या आजोबांनी चक्क तोंडाच सिगरेट धरत रॉकेट्सची वात पेटवली आहे. हा खतरनाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे आजोबा किती धोकादायक स्टंट करत आहेत. यामध्ये त्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता आहे. एखादं रॉकेट जर हातातच फुटलं तर चेहरा भाजण्याची शक्यता आहे. मात्र हे आजोबा कशाचीही चिंता न करता बिनधास्त तोंडात सिगरेट आणि हातात रॉकेट्स उडवत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे तो जळत्या सिगरेटनं या रॉकेट्सची वात पोटवतोय. न घाबरता आजोबा एकामागून एक रॉकेट्स आकाशात सोडत आहे. हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. नासाच्या निर्मितीमागे भारतीयांचा मोठा हात आहे असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ट्रॅफिक पोलिसांच्या फाईनपासून वाचण्यासाठी तरुणाचा देसी जुगाड; अवघ्या २ सेकंदात तयार केलं हेल्मेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @susantananda3 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.