कुत्रा हा अनेकांचा आवडता प्राणी आहे. कित्येक लोक कुत्रा घरी पाळतात. त्यांची काळजी घेतात. त्यांच्यावर प्रेम करतात. प्राणीप्रेमी असणारे लोक सोशल मीडियावरही कुत्र्याचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतात.
अनेकदा असे म्हटले जाते की कुत्रा हा माणसापेक्षाही जास्त प्रामाणिक आहे पण याशिवाय त्याच्याकडे असे अनेक गुण असू शकतात जे पाहून तुम्ही त्याचे चाहते व्हाल.
सध्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये कुत्रा पाण्याने भरलेला ग्लास घेऊन ऐटीत चालताना दिसत आहे. कुत्र्याचा अविश्वसनीय बॅलन्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : नदीत पडलेल्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी केला जुगाड; कुत्र्याने तोंडात दोरी पकडून …; पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक कुत्रा कपाळावर पाण्याने भरलेला ग्लास घेऊन ऐटीत चालताना दिसत आहे. कुत्र्याची ही एकाग्रता आणि बॅलन्स नियंत्रित ठेवण्याची शैली पाहून तुम्हीही भारावून जाऊ शकता. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. बॅलन्स कसा असावा, हे या कुत्र्याकडून खरंच शिकायला पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

malinois_trainingcourse या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘खरा बॅलन्सिग अ‍ॅक्ट’. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी कुत्र्याच्या या अनोख्या शैलीचे कौतुक केले आहे तर काही युजर्सनी असे अ‍ॅक्ट कुत्र्याकडून करू नये, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.