Leopard Entered in House: आजकाल दर काही दिवसांनी काही वन्य प्राणी वस्तीत शिरल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. किंबहुना सातत्याने कमी होत असलेल्या वनक्षेत्रामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे जंगले नाहिसे होताना दिसत आहेत. त्यामुळे शहरात जंगली प्राण्यांचा वावर वाढताना दिसून येतो. जंगली प्राणी शहरात, गावात घुसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कधी बिबट्या तर कधी धोकादायक साप कुणाच्या घरात आढळतो. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एका व्यक्तीच्या घरातील स्वयंपाकघरात साप आढळून आला होता. अशा घटनांमुळे सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण होते की, आपण स्वत:च्या घरातही सुरक्षित नाही तर कुठे जायचे.

मानवी वस्तीत जंगलातील प्राणी विशेषत: बिबट्या घुसण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. आतापर्यंत जंगलातून वस्तीपर्यंत आलेल्या बिबट्याची मजल थेट घरात घुसण्यापर्यंत झाली आहे. अशावेळी काही प्रसंग असे घडतात की, अंगावर शहारा आणणारे ठरतात. बिबट्याने हल्ला केल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. आता अशीच एक बातमी हरियाणातून येत आहे जिथे बिबट्या गावात येऊन कोणाच्या तरी घरात घुसला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर करताना, न्यूज एजन्सी एएनआयने माहिती दिली आहे की, गुरुग्रामच्या नरसिंगपूर गावात आज बुधवारी सकाळी एका घरात बिबट्या घुसला. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक आणि गुरुग्राम पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसते की, पायऱ्या चढत बिबट्या घरात घुसला. बिबट्या घरात घुसल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

(हे ही वाचा:“नवीन वर्षाची पार्टी करण्यासाठी…”, दुखी झालेल्या व्यक्तीच्या चॅटचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल, मेसेजमध्ये काय लिहिलं होतं?)

येथे पाहा व्हिडीओ

लोकं काय म्हणाले?

वृत्त लिहेपर्यंत २२ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, “बिबट्या त्या भागात दिसणे सामान्य आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “जर तुम्ही जंगलात जाऊन इमारती एक्सप्रेसवे बांधलात तर हे प्राणी तुमच्या घरी नक्कीच येतील.”